संग्रामपुर [ मकसूद अली ] तालुक्यातील टाकळी पंच येथे प्रकाशदादा वानखडे मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सामाजीक कार्यकर्ते प्रकाश उर्फ संदिप वानखडे यांच्या वतीने टाकळी पंच येथील जि प मराठी शाळे समोर संविधान गौरवदिना निमित्त वऱ्हाडी लोकगिताच्या कार्यक्रमासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्व प्रथम सविधान दिना निमित्त घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व सविधांन ग्रंथाचे पूजन करून विविध कार्यक्रम संपन्न झाले भारताची स्वतंत्र राज्य घटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी अंगिकृत व अधिनियमित करून स्वतप्रत अर्पण करण्यात आली व्यासपीठावरील उपस्थीत मान्यवरांनी सविधांना बाबत मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे उद्घाटन ॲड प्रसेन्नजीत पाटील यांचे हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी विश्वनाथ झाडोकार तर वंचीत बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे, डॉ प्रविण चोपडे माजी जि प उपाध्यक्ष संगितराव भोंगळ , सामाजीक कार्यकर्ते प्रकाश वानखडे , शिवसेना तालुकाप्रमुख रविन्द्र झाडोकार , सामाजीक कार्यकर्ते संजय वाकळे , माजी सरपंच शिवहरि खोंड , मधुकर वानखडे सरपंच पुष्पाताई पंजाबराव वानखडे कॅसेट सिंगर भगवान शिरसाट, गायीका शिल्पा बुधे नागपुर आदीची प्रमुख उपस्थिती होती यावेळी कॅसेट सिंगर भगवान सिरसाट व गायीका शिल्पा बुधे यांच्या संचाने वऱ्हाडी लोकगित सादर केले कार्यक्रमाला टाकळी पंच कोशितील नागरिकांनी आस्वाद घेतला कार्यक्रम यशस्वीते साठी अंबादास इंगळे , बाळू वाकळे ,सुनिल मेहेंगे , नागशेष वानखडे, भास्कर इंगळे बाबुलाल वानखडे यांनी प्रयत्न केले
