Homeबीड ग्रामीणजिल्हाधिकारी वैक्सीन साठी दारोदारी ; मोमिन पु-यात पायी फिरुन दीले वैक्सीन .!

जिल्हाधिकारी वैक्सीन साठी दारोदारी ; मोमिन पु-यात पायी फिरुन दीले वैक्सीन .!

बीड : आज सकाळी 9 वाजता बीड चे जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन शर्मा यांनी मोमीन पुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देत कोरोना लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला आणि जिल्हाधिकारी आपल्या दारी या मोहिमे अंतरगत घरोघरी जावून प्रातिनिधिक स्वरूपात लसीकरण करून उद्घाटन केले,तसेच यावेळी त्यांनी कोरोणा लसीकरण करणे का गरजेचे आहे ते ही मार्गदर्शन केले, यावेळी उपविभागीय अधिकारी टिळेकर साहेब,तहसिलदार ढोके साहेब,आरोग्य अधिकारी कासट साहेब, डॉ.हाश्मी,डा. इसहाक साहेब,उपस्थित होते तसेच यावेळी येथील माजी सभापती तथा निजोजन समितीचे सदस्य खुर्शीद आलम यांनी ही लसीकरणाची महत्व सांगितले आणि यापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रात केलेल्या लसीकरणा चा आढावा सादर केला, जिल्हाधिकारी यांनी पायी चालत घरोघरी जाऊन लसी करन करून घेतले आणि जास्तीत जास्त लसीकरण घेण्याचे आवाहन केले,याप्रसंगी नियोजन समिति सदस्य तथा मा सभापति खुर्शीद आलम,हाजी वजिर साहेब, हाफेज अश्फाक नगरसेवक,मोमीन अझहर,प्रा.अमर शेख, डॉ. ईसहाक ,जलीलभाई,शेख मोहममद, मोहममद झिशान,पठाण साहेब,शेख चांद साहेब, मोमीन शहेबाज,लतीफ भाई,अलीम सर,राजू भाई,गुलाम रसूल इनामदार, हादी पेंटर,पठाण शमशिर खान,कलीम सर, शेख वाजेद, एस आय चांदणे,मुबिंन, भालेराव मेडम,साबळे,निंबाडकर,यांच्यासहित लस घेणारे अनेक महिला,पुरुष आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments