बीड : आगामी नगरपरिषदांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून एआयएमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खा. बॅरिस्टर अल्हाज असदुद्दिन ओवैसी, ज्येष्ठ नेते तथा आ. अकबरुद्दीन ओवैसी, प्रदेशाध्यक्ष तथा खा. इम्तियाज़ जलील, राज्य कार्याध्यक्ष डॉ. अब्दुल गफ़्फ़ार क़ादरी, मराठवाडा विभागाध्यक्ष फिरोज लाला, मराठवाडा कार्याध्यक्ष कलीम रमज़ानी, मराठवाडा समन्वयक सुमेर रिज़वी यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफिक भाऊंच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांचे पदाधिकारी निवडण्याची प्रक्रिया सुरू केली असून या अंतर्गत सर्वप्रथम अंबाजोगाई तालुक्यातील कार्यकारिणी जाहीर करून विविध पदांवर कार्यकर्त्यांची निवड केली आहे. हि निवड पक्षाचे जिल्हा प्रवक्ते शेख रमीज़ सर आणि अंबाजोगाई शहराध्यक्ष हिफ़ाज़त पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये समीर शेख यांना युवा तालुकाध्यक्ष, सत्तार तंबोली युवा शहराध्यक्ष, फिरोज शेख बाबा आरोग्य सेल तालुकाध्यक्ष, आरिफ खान आरोग्य सेल शहराध्यक्ष, शेख ज़फ़र व्यापारी संघ शहराध्यक्ष, यास्मिन तांबोळी तालुकाध्यक्ष महिला आघाडी, सुब्हानी आपा शहराध्यक्ष महिला आघाडी, आरेफ़ काझी ऑटो युनियन अध्यक्ष, आदींना विविध पदांवर नियुक्त करण्यात आले. यावेळी पक्षाचे जिल्हा सचिव हाजी अय्युब खान पठाण, शेख एजाज़ खन्ना भैय्या, परळी तालुकाध्यक्ष शेख शरीफ़ भाई, शहराध्यक्ष अकबर कच्छी, कादर कुरेशी, सोफियान मनियार, विक्रम भाई, समीर भाई, नदीम भाई, पक्षाचे खंदे समर्थक शेख अजीज, शेख तय्यब, ॲड. शेख मुकर्रम, शेख चांँद, शेख हारून, परवेज खान, शाहरुख पठाण, मसूद रजा, शेख मुखीद, ए.एस.बागवान, शेख सलीम, शेख नसीम, शेख राहील, सय्यद नदीम आदींसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
एआयएमआयएम पक्षाची अंबाजोगाई तालुका कार्यकारिणी जाहीर!
महिलांनाही प्राधान्य देणार – शफिक भाऊ
अंबाजोगाई तालुका कार्यकारिणी निवडताना पुरुष कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह महिला वर्गाला ही पक्ष प्राधान्य देणार आहे. याच दृष्टिकोनातून अंबाजोगाई तालुका महिला आघाडी अध्यक्षपदी यास्मीन बाजी यांची तर महिला आघाडी शहराध्यक्षपदी सुब्हानी आपा यांची निवड करण्यात आली. समाजातील प्रत्येक क्षेत्रात पक्षाकडून पुरुष पदाधिकाऱ्यांसह महिला पदाधिकाऱ्यांना ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समाजाचे प्रश्न पक्षाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी तयार करायचे आहे. याच दृष्टिकोनातून महिलावर्गाला पदाधिकारी बनवितांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊ यांनी यावेळी बोलताना म्हटले.
RELATED ARTICLES