HomeUncategorizedपिंपळा येथे एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या वतीने पोषण आहार कार्यक्रम आयोजित!

पिंपळा येथे एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या वतीने पोषण आहार कार्यक्रम आयोजित!

आष्टी  (पठाण शाहनवाज) :  माता आणि बालके सदृढ राहावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांतर्गतच माता व बालकांना सशक्त करण्यासाठी पिंपळा येथे पोषण आहार अभियान राबवण्यात आले.

 बालकांना सशक्त बनविण्यासाठी या कर्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. महिनाभर चालणारे हे अभियान जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रात राबविण्यात येत आहे. मातेला पोषक आहार व चांगली आरोग्यसेवा मिळण्यासाठी व त्यांचे योग्यपणे पोषण होण्यासोबतच कुपोषण दूर होण्यासाठीच्या विविध उपायांचा व उपक्रमांचा त्यात समावेश आहे. या अभियानांतर्गत जनजागृती, पोषण मेळावे राबवण्यात येत आहे.
या अभियानादरम्यान प्रामुख्याने पोषण आहार व त्याचे महत्त्व, स्तनपान, अ‍ॅनेमिया आजार, वैयक्तिक स्वच्छता या विषयांवर अधिक लक्ष देण्यात येणार आहे. गृहभेटीद्वारे पोषण आहार, चांगल्या आरोग्याच्या सवयींचे महत्त्व पटवून देण्यात येणार असल्याची माहिती रासने मॅडम यांनी सांगितली.यावेळी अंगणवाडी सेविका रंजना दुर्गे व आशा सेविका सविता अरुण यांनी गर्भवतींची काळजी, प्रसूतीनंतर बालकाला तत्काळ व सहा महिन्यांपर्यंत निव्वळ स्तनपान, सहा महिने पूर्ण झालेल्या बालकाला वरचा आहार, किशोरवयीन मुलींमधील रक्त अल्पता, मुलींचे शिक्षण, पोषण आहार व विवाहाचे योग्य वय, वैयक्तिक स्वच्छता व परिसर स्वच्छता पोषणमूल्य असलेल्या आहाराचे सेवन, याबाबत माहिती देण्यात आली 
माता व बालकाला पोषक आहार व चांगली आरोग्य सेवा मिळण्यासाठी तसेच कुपोषण दूर होण्यास हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.असे मत सामाजिक कार्यकर्ते सुखदेव लोखंडे व्यक्त केले.व तसेच रामदास आण्णा शेंडगे (उपसरपंच ) यांनी सांगितले की राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यानतंर आता सरकारकडून संभाव्य तिसऱ्या लाटेबद्दल खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका बालकांना असल्याने त्या लहान मुलांच्या पोषण आहाराबाबत मार्गदर्शन आणि जनजागृती कारण गरजेच असल्याचं सांगितले आहे. या कार्यक्रमासाठी डॉ.गिरी मॅडम व डॉ. शिंदे सर तसेच गावातील अंगणवाडी सेविका रंजना दुर्गे,खातून शेख आशा सेविका मीरा शेलार, सविता अरुण, छाया लोखंडे ,आरोग्य सेविका… महिला बचत गटाच्या अध्यक्ष वंदना दिंडे, तसेच रामदास अण्णा शेंडगे उपसरपंच,व सामाजिक कार्यकर्ते अमोल काकडे, युवराज खटके, सुखदेव लोखंडे व गावातील गरोदर माता उपस्थित होते.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments