आष्टी (पठाण शाहनवाज)
रझाकारामुळे निजामशाही बदनाम झाली. अखंड भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सहाजिकच होते की उर्वरित प्रांतांना सुद्धा स्वातंत्र्य हे मिळालेच पाहिजे.याची कुठेतरी मनात सल होती.मराठवाड्यात हिंदू-मुस्लीम एकोपा कायम होता.हा भाईचारा स्वातंत्र्यलढ्यात सुद्धा खंबीरपणे दिसून आला.अन्यायाची हद्द संपलेल्या मराठवाडी माणसांसाठी मुक्तीचा लढा आवश्यक होता. असे संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे यांनी उदगार काढले.आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणानंतर ते बोलत होते.डॉ.सखाराम वांढरे यांच्या प्रास्ताविका नंतर प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे,प्रमुख वक्ते डॉ.भगवान वाघमारे यांनी आपले विचार मांडले.व्यासपीठावर सचिव अतुल सेठ मेहेर,तय्यब सेठ,प्रा.महेश चौरे, खलील खान आदी उपस्थित होते. उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब मुटकुळे यांनी सूत्रसंचालन केले.