HomeUncategorizedमहावितरणच्या मुख्य अभियंता पदी सुंदर लटपटे!

महावितरणच्या मुख्य अभियंता पदी सुंदर लटपटे!

बीड : महावितरणच्या बीड, उस्मानाबाद, लातूर विभागाच्या मुख्य अभियंता पदी सुंदर लटपटे यांची बढतीने नियुक्ती झाली आहे. नाशिकच्या प्रशिक्षण व सुरक्षा केंद्रात मुख्य महाव्यवस्थापक पदी कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी बीडसह अनेक जिल्ह्यात कार्यकारी अभियंता, अधिक्षक अभियंता म्हणून काम केले आहे. शिस्तीचे व कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांची ओळख असल्याने या विभागात महावितरणच्या कामात चांगला परिणाम होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

 महावितरणच्या बीड, उस्मानाबाद, लातुर विभागीय मुख्य अभियंतापदी बढतीने सुंदर लटपटे यांची नियुक्ती करण्यात आली असुन त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. परभणी जिल्ह्यातील कोद्री (ता.गंगाखेड) येथील रहिवाशी असलेले सुंदर लटपटे यांनी महावितरणमध्ये  निलंगा, उदगीर, लातूर या भागात कार्यकारी अभियंता म्हणून सक्षमपणे काम केले. तर बीड व पुणे येथे अधिक्षक अभियंता म्हणून त्यांनी आपला कार्यकाळ गाजवला. बीड जिल्ह्यात महावितरणच्या विस्कळीत व्यवस्थेला पूर्णपणे ताळ्यावर आणून थकबाकी वसुलीही मोठ्या प्रमाणात करण्यात यश मिळवले होते. तर भारनियमन कमी करुन शेतकर्‍यांसाठी वीज पुरवठा अधिक सुरळित केला. वीज ग्राहकांना चांगली सेवा मिळावी आणि यंत्रणेतील गैरप्रकार निष्काळजीपणा थांबवण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या. ज्याची राज्यस्तरावर दखल घेतली गेली. त्यामुळे लातुर विभागाची सुत्रे त्यांच्याकडे आल्यामुळे या विभागात चांगला परिणाम होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments