HomeUncategorizedखाजगी संस्थेतील कर्मचाऱ्यांना बीएलओ पदावरून तात्काळ कार्यमुक्त करा ; संभाजी सुर्वे, ए...

खाजगी संस्थेतील कर्मचाऱ्यांना बीएलओ पदावरून तात्काळ कार्यमुक्त करा ; संभाजी सुर्वे, ए एस गोलू

बीड : येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने नव मतदार नोंदनी व दोन जाग्यावर मतदारांचे असलेले नाव वगळण्यासाठी अनेक खाजगी शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे ती पुर्णतः चुकीची आहे. संस्था चालक हे राजकीय असतात म्हणून संस्थेवरच्या कर्मचाऱ्यांकडून दबावाने मतदार यादी मध्ये अफरातफर होऊ नये म्हणून अशा खाजगी संस्थेतील कर्मचाऱ्यांची निवडणुक प्रक्रियेत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या BLO पदावर नियुक्ती करू नका असे आवाहन निवडणुक विभागाला भाजपा युवा नेते संभाजी सुर्वे व भाजपा अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष ए एस गोलू यांनी केले आहे.

याबाबत सविस्तर असे की, सर्व शैक्षनिक संस्था ह्या कोणत्या ना कोणत्या राजकिय नेत्यांच्या आहेत. आणि जरी त्यातील काही संस्था राजकीय नेत्यांच्या नसल्या तरी त्याची झालर कुठेतरी नेतेगिरीची असतेच. आणि याच संस्थेतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती BLO म्हणून निवडणुक विभागाने केली आहे. या संस्थेतील कर्मचाऱ्यांची जर या महत्वाच्या पदावर नियुक्ती केली तर मग निवडणुक घेण्याची गरजच काय? कारण त्या संबंधित संस्थेच्या संस्था चालकानी सांगितल्यास जे नावं पाहिजेत तशा प्रकारचे नावं ते BLO पदावर असलेले कर्मचारी नवीन घेऊ शकतात व ज्या लोकांपासून त्या संस्था चालकाच्या राजकारणाला अडथळे येतात तशी नावे काढू पण शकतात असा संशय येत आहे. जर का संस्थेतीलच कर्मचारी BLO म्हणून घेणार आसताल तर निवडणूक घेताच कशाला? खरोखरच निवडणूक घेण्याची निवडणूक विभागाची इच्छा असेल तर अशा खाजगी संस्थेतील कर्मचाऱ्यांची या BLO पदावर नियुक्ती करू नये नसता निवडणुक विभागात तीव्र प्रकारचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपा युवा नेते संभाजी सुर्वे व भाजपा अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष ए एस गोलू यांनी दिला आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments