HomeUncategorizedआष्टी तालुका काँग्रेस कमिटी करणार शेतकरी संवाद दौरा ; अँड विनोद निंबाळकर!

आष्टी तालुका काँग्रेस कमिटी करणार शेतकरी संवाद दौरा ; अँड विनोद निंबाळकर!

आष्टी पठाण शाहनवाज                                                                    

शेतकरी आंदोलनाला पाठींबा देत प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोचवण्यासाठी आष्टी तालुका कॉंग्रेस कमिटी तर्फे शेतकरी संघर्ष संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान शेतकरी आंदोलन यशस्वी होण्यासाठी दिल्लीत शेतकरी संघर्ष करीत आहेत. केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे करून शेतकऱ्यांना वेठीस आणले आहे. म्हणून आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व शेतकरी विरोधी कायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत गावा गावात समजून सांगण्यासाठी ही मोहीम मा.खासदार रजनीताई पाटील बीड काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या 21 सप्टेंबर पासून राबविण्यात येणार असल्याचे आष्टी तालुका कॉंग्रेस कमिटी चे तालुका अध्यक्ष विनोद निंबाळकर यांनी सांगितले.

तसेच आष्टी तालुक्यातील गोरगरीब कष्टकरी मजूर ह्यांच्या समस्या सोडवण्यासाठी व शासन योजना गरजू लोकांना लाभ मिळवून देण्यासाठी व संघटन मजबूत करण्यासाठी हा दौरा असल्याचे विनोद निंबाळकर यांनी सांगितले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments