HomeUncategorizedऔरंगाबाद येथे भीषण अपघात आईचा मृत्यू ; दोन बालक गंभीर जखमी..!

औरंगाबाद येथे भीषण अपघात आईचा मृत्यू ; दोन बालक गंभीर जखमी..!

औरंगाबाद : करमाड येथे चारचाकीने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील वृद्ध महिलेचा मृत्यु झाला.दुचाकी चालक व दोन बालके गंभीर जखमी झाले आहेत. शेंद्रा एमआयडीसी मुख्य रस्त्यावरील हर्मन कंपनीसमोर रविवारी रात्री आठ वाजता हा गंभीर अपघात झाला. हा अपघात एवढा भयंकर होता की चारचाकी वाहनाने दुचाकीने धडक दिल्यानंतर दुचाकी सुमारे 60 फूट उंच उडाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेत कचराबाई जाधव (वय 60) यांचे उपचारापूर्वीच निधन झाले. तर अनिल जाधव (35), छकुली अनिल जाधव (12), तर बंटी अनिल जाधव (10, सर्व रा. नाथनगर, वडखा, ता.औरंगाबाद) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.

या घटनेत अनिल जाधव हे आपल्या दुचाकीवरून (एमएच 20 डीडब्लू 3054) जालना महामार्गाकडे आई व मुलांसह जात होते. यावेळी हर्मन चौकात भरधाव चारचाकी वाहनाने (एमएच 20 एफपी 6878) दुचाकीस जोराची धडक दिली. ही धडक एवढी जोराची होती की चारचाकीची एअरबॅग उघडली गेली व दुचाकी सुमारे 60 फुट उंचीवर जाऊन पुन्हा दुभाजकावर आदळली. यात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. घटनेनंतर चारचाकी चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. रात्रीची वेळ असल्याने या ठिकाणी रहदारी कमी होती. काही प्रत्यक्षदर्शींनी थेट जखमींना रुग्णालयात पोहोचवले. दरम्यान, उपचारापुर्वीच कचराबाई यांचे निधन झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. तर अनिल जाधव यांचे दोन्ही पाय निकामी झाले असुन दोन्ही मुलं गंभीर असल्याचे समजते.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments