HomeUncategorizedशाळा महाविद्यालये सुरू करण्यासाठी आष्टी तालुक्यात उभारले जाणार जन आंदोलन!

शाळा महाविद्यालये सुरू करण्यासाठी आष्टी तालुक्यात उभारले जाणार जन आंदोलन!

आष्टी पठाण शाहनवाज
कोव्हीड १९च्या नावाखाली शाळा बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून पिढ्या बरबाद होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. यावर कुणीही भाष्य करताना दिसत नाही. यासाठी आष्टी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, संघटना,सरपंच,ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, संस्था चालक, विद्यार्थी पालक एकत्र येत दिनांक २० सप्टेंबर रोजी हिवरे बाजार भेटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १०० पेक्षा जास्त जणांची उपस्थिती होती. उपस्थित लोकांची तळमळ पहाता मा.पोपट पवार यांनी सुमारे दीड तास मार्गदर्शन करत सर्वांना आप आपल्या गावात पहिली पासून शाळा सुरू करा लागले ती मदत मी करेल असे आश्वासन देत ही क्रांतीची ठिणगी क्रांतीची देणगी असलेल्या आष्टी तालुक्यात पडत असल्याने समाधान व्यक्त केले.   
  याकामी सर्व वैयक्तिक मतभेद, पक्ष पार्टी विरहीत जन आंदोलन आष्टी तालुक्यात सुरू करण्याचे ठरले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments