धारूर
धारूर ते तेलगावा जाणारॆ राष्ट्रीय महामार्ग घाटात या रस्त्याचे काम अरूंद असल्याने वारंवार या ठिकाणी अपघात होत आहेत, साखर घेऊन जाणारा एम एच ४८ बी २६४८ अवघड वळणावर दरी कडील कठडा तोडून पलटी झाला. सुदैवाने चालक वाहक बचावले, ट्रकही दरीत गेला नाही. माञ या रस्त्यावरील अपघाताची मालिकाच थांबत नाही. त्यामुळे वाहनधारकात भिती वाढत आहे.
येथील घाटात वारंवार अपघाताची मलिक सुरू असल्याचे दिसून येत आहे. मागील दोन दिवसा पूर्वीच सिमेंट घेऊन जाणारा टँकर खोल दरीत कोसळून चालकाचा मृत्यू झाला होता. त्याचा अंत्यविधी होतो का नाही तो पर्यंत याच घाटात साखर घेऊन जाणार ट्रक अवघड वळणावर दरीच्या बाजूने कठडा तोडून पलटी झाला असून झाडाला अडकल्याने २०० ते तीनशे फूट खोल दरीत पडण्या पासून वाचला सुदैवाने या ट्रक मधील चालक व वाहक बचावले आहेत.या घाटात नेहमी अपघात चालू आहेत प्रशासन व लोकप्रतिनिधी चे पूर्णतः दुर्लक्ष असून आणखीन किती प्रवाश्यांचे बळी घेणार आहेत असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे ठोस उपाय योजनाची गरज आहे. रोजच्या अपघातााच्या मालिकेमुळे वाहन धारकात माञ भिती निर्माण झाली आहे.