HomeUncategorizedरस्त्या पेक्षा साईट पट्टी बरी ; रस्ता सोडून साईट पट्टीवरून प्रवाशांचा साबलखेड...

रस्त्या पेक्षा साईट पट्टी बरी ; रस्ता सोडून साईट पट्टीवरून प्रवाशांचा साबलखेड ते आष्टी जीवघेणा प्रवास!


आष्टी पठाण शाहनवाज
आष्टी तालुक्यातील अहमदनगर जामखेड रोड वरील साबलखेड ते दूध संघ आष्टी पर्यंतचा रस्ता म्हणजे खड्डयात रस्ता की रस्त्यावर खड्डा अशी अवस्था झाली आहे.साबलखेड ते आष्टी प्रवास जीव मुठित धरून करावा लागत आहे.कित्येक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.चारचाकी वाहनांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.रस्त्यावर इतके खड्डे आहेत की दुचाकी स्वार रस्ता सोडून साईट पट्टीवरून प्रवास करीत आहेत.वाहनांची वर्दळ असणाऱ्या अहमदनगर जामखेड रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून ठायी ठायी खड्डे निर्माण झाल्याने अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. लोकप्रतिनिधींसह सर्वानीच रस्त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले आहे.
तालुक्यातील आष्टी आणि कडा या दोन प्रमुख शहरांना जोडणारा तसेच बीडकडे जाणारा हा रस्ता काही महिन्यांपासून पूर्णपणे उखडला गेला आहे.सुलेमान देवळा हिवरा धानोरा खूंटेफळ शिरापुर सह अन्य गावातील शेतकऱ्यांना याच रस्त्याने बाजार समिती गाठावी लागते. त्यांना रस्त्याच्या बिकट अवस्थेचा मोठा फटका सहन करावा लागत असून रस्त्याच्या अवस्थेमुळे टायर पंक्चर होणे, टायर फुटणे तसेच वाहनातून शेतीमाल सांडणे यासारख्या समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेकांनी या रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली असली तरी त्याकडे कोणीही लक्ष दिलेले नाही. रस्त्यावरील खड्डय़ांमुळे वाहन चालकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी कडा येथे रस्ता दुरूस्तीचे काम करण्यात आले. त्यामुळे अहमदनगर जामखेड रस्ता दुरूस्त केला जाईल, अशी अंधुकशी आशा होती. परंतु ही आशा फोल ठरली असून दुरूस्ती होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे
 बुकिंग के लिए संपर्क :- मोमीन सिराज 8149814902
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments