HomeUncategorizedमहाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनची परळी तालुका कार्यकारणी जाहीर!

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनची परळी तालुका कार्यकारणी जाहीर!

परळी : राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या परळी तालुका अध्यक्षपदी उत्तम मुंडे तर उपाध्यक्षपदी अजय बळवंत यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. दरम्यान निवडीनंतर पंचायत समितीचे उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

          महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन नागपूर जिल्हा शाखा बीडची जिल्हास्तरीय बैठक ज्येष्ठ मार्गदर्शक मा.राजेंद्र गर्जे,मा.जयलाल राजपुत,मा.सुनील घोडके,मा.परशुराम अर्सुळ,मा.अनंत खेडकर,मा.भागवत थापडे,मा.प्रवीण येवले,मा.दयानंद सरपते आदी मान्यवराच्या उपस्थितीत बैठकीत जिल्हा कार्यकारिणी जाहीर नुकतीच आली आहे. तालुकास्तरीय कार्यकारणी मध्ये परळी तालुका अध्यक्षपदी उत्तम मुंडे,सचिवपदी प्रविण रोडे, उपाध्यक्षपदी बळवंत अजय,कार्याध्यक्षपदी अंगद देवकते,सचिवपदी श्रीराम शेरेकर, कोषाध्यक्षपदी जगन्नाथ कराड यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष उत्तम मुंडे व अजय बळवंत म्हणाले की, निवड झाल्याबद्दल जिल्हाध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानून कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन सदैव तत्पर राहणार आहे असे म्हणाले.सर्व कर्मचाराचा सुख दुःखा मध्ये संघटनां नेहमी कर्मचार्‍यांच्या पाठीशी राहील. यानिवडीनंतर पंचायत समितीचे उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांनी तालुका कार्यकारणीची सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे, गटविकास अधिकारी संजय केंद्रे व सर्वांनी अभिनंदन केले आहे.
जाहिरात 👇👇👇
ताज पॅलेस & हॉल

बुकिंग के लिए संपर्क :- मोमीन सिराज 8149814902

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments