HomeUncategorizedघरफोडी करणारे सराईत गुन्हेगार गुन्हे शाखेकडून जेरबंद, २२ लाखाचा मुद्देमाल हस्तगत!

घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार गुन्हे शाखेकडून जेरबंद, २२ लाखाचा मुद्देमाल हस्तगत!


पुणे : शहर व परिसरामध्ये घरफोडी करून लाखोंचा ऐवज लंपास करणारे तीन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून ८ गुन्हे उघडकीस आले असून २२लाख ९ हजार ९३६ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.जप्त करण्यात आलेल्या मुद्देमाल मध्ये २० तोळे सोन्याचे दागिने, १४ किलो चांदीचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहेे.
गुन्हेगारी अभिलेखावरील आरोपी सचिन उर्फ राहुल माने उर्फ लखन अशोक कुलकर्णी (वय २८ वर्ष), सारंग उर्फ सागर संजय टोळ (वय २५ वर्ष) व सनी महेशकुमार तनेजा (वय ३१ वर्ष, सर्व रा. मोहम्मदवाडी हडपसर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत, तर त्यांचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.त्यांच्या ताब्यात मधील एक स्विफ्ट डिझायर कार, कोयता,चाकू, स्क्रू ड्रायव्हर, मिरची पूड, नायलॉन दोरी मुद्देमालासह लोणीकंद ते फुलगाव रोड वढु खुर्द फाटा येथून अटक करण्यात आली.
त्यांच्याकडे कसून तपास केला असता लोणी काळभोर, लोणीकंद, कोंढवा, वानवडी, सिंहगड, येरवडा, चिपळून परिसरामध्ये घरफोडीचे गुन्हे केल्याची आरोपींनी कबुली दिली आहे.त्यांच्या विरुद्ध लोणी कंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त पुणे अमिताभ गुप्ता, पोलीस उपायुक्त डॉ राजेंद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे भाग्यश्री नवटके, उपायुक्त गुन्हा श्रीनिवास घाडगे, सहा पोलीस आयुक्त गुन्हे लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सपोनि नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, नितीन मुंडे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे याचे पथकाने केली.
जाहिरात 👇👇👇
ताज पॅलेस & हॉल

बुकिंग के लिए संपर्क :- मोमीन सिराज 8149814902

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments