जालना : शहरात असलेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात नियुक्तीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने मंगळवार (दि.21) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. श्रीकांत दिलीप पाटील असे मयत पोलिस कर्मचार्याचे नाव असून ते सुख शांती नगर येथे राहण्यास होते.
मंगळवारी त्यांनी सकाळी दहा वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
उत्तरीय तपासणीसाठी त्यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक एस. बी. भताने यांनी दिली. या पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या का केली? हे नेमके कळू शकले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
जाहिरात 👇👇👇
ताज पॅलेस & हॉल