आष्टी : पठाण शाहनवाज
गेल्या सोळा महिन्यांपासून महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालय कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली आहेत.
कोरोना आजाराची तीव्रता आता बर्यापैकी कमी झालेली असताना महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे मेळावे,सभा धार्मिक उत्सव,अनेक ठिकाणी सुरू झालेले दिसत आहेत.
परंतु फक्त शाळा आणि महाविद्यालयांच्या बाबतीतच सरकार वारंवार कोरोना आजाराचे निमित्त पुढे करून शिक्षण व्यवस्था बंद करत आहे.
ऑनलाइन शिक्षण हा शिक्षणाचा पर्याय होऊच शकत नाही हे वारंवार लक्षात येत आहे.गेल्या दोन वर्षापासून कुटुंब परस्थिती अभावी मुलांना मोबाईल घेऊन देऊ शकत नाही,काही मुले तर ऑनलाइन क्लासच्या निमित्ताने मोबाईल वर वेगवेगळ्या प्रकारच्या गेम खेळताना दिसतात.
त्यामुळे शिक्षणाचा मूळ हेतू दूर जाताना दिसत आहे.त्याचे दुरगामी वाईट परिणाम भविश्यात दिसणार आहेत नव्हे तर एक पिढीच बरबाद होते की काय आशी सुद्धा अवस्था निर्माण झालेली आहे.
या सर्व गोष्टींचा विचार करून नगर जिल्ह्यातील आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपट पवार यांनी शंभर दिवसापूर्वीच संपूर्ण क्षमतेने त्यांच्या गावातील पहिली ते दहावी ही शाळा सुरू केलेली आहे. त्याच अनुषंगाने आष्टी तालुक्यातील शिक्षण प्रेमी नागरिक असंख्य गावचे सरपंच व काही शिक्षक,आणि प्राध्यापक यांनी काल दिनांक 20 सप्टेंबर रोजी येथे मा.श्री.पोपट पवार यांची भेट घेऊन त्यांची शाळा कशाप्रकारे चालवली जाते याची माहिती घेऊन राज्य सरकारने सर्व शाळा व महाविद्यालये सुरू करण्यासाठी तातडीने अध्यादेश काढावा अशा प्रकारचे निवेदन देऊन त्यांना विनंती करण्यात आली.
याप्रसंगी मा.पोपट पवार यांनी आपल्या भावना माननीय मुख्यमंत्री महोदय यांना फोन करून तातडीने कळवत अशा प्रकारचे आश्वासन देऊन ग्रामीण विकास व शिक्षण व्यवस्था या संदर्भात दिलखुलासपणे मार्गदर्शन केले. छोटेखानी बैठकीमध्ये पाणलोट क्षेत्र विकास,वृक्ष लागवड व संवर्धन,शैक्षणिक बळकटीकरण आणि आदर्श गाव संकल्पना राबवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे अतिशय आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
त्यांच्या जीवनातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना आलेले वेगवेगळे अनुभव आणि अडचणी गावामध्ये सरपंच पदाची निवडणूक लढविण्यासाठी झालेले छोटे-मोठे विरोध आणि ग्रामस्थांच्या पाठबळावर राष्ट्रीय नव्हे तर जागतिक स्तरावर आदर्श गाव हिवरे बाजारचे नाव नेण्यासाठी केलेली प्रयत्नांची पराकाष्टा या सर्व वेगवेगळ्या विषयावर अतिशय सुंदर मार्गदर्शन केले .
तसेच त्यांना आलेले अनुभव त्यांनी सांगितले.
जर दोन दिवसांमध्ये शाळा सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय न घेतल्यास दिनांक 24 सप्टेंबर रोजी आष्टी येथे माननीय तहसील कार्यालयावर शिक्षण प्रेमी नागरिकांच्या वतीने मोर्चा काढून घंटानाद आंदोलन करण्यात येईल,अशी माहिती शिक्षण प्रेमी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
त्याचे निवेदन माननीय तहसीलदार,पोलीस स्टेशन,माननीय जिल्हाधिकारी कार्यालय,शिक्षण अधिकारी कार्यालय,माननीय शिक्षण मंत्री व माननीय मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य यांना देण्यात येणार आहे अशी माहिती प्रा.राम बोडखे सर,सरपंच रवींद्र मोडवे व शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष.डॉ.शेख अजमुद्दिन युवा नेते धैर्यशील थोरवे यांनी दिली आहे.याप्रसंगी उपस्थितीत शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी दत्तात्रेय गिलचे सर सरपंच प्रा.राम बोडखे,अमोल काकडे,युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष.युवराज खटके सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र आबा वाळके,प्राणी मित्र.प्रा.दादा विधाते,सरपंच,माजी सरपंच बाजीराव वाळके पाटील,सरपंच विजय गायकवाड सरपंच योगेश शेळके उपसरपंच रमेश अमृते,सरपंच सावता ससाणे,पत्रकार रहेमान सय्यद छायाचित्रकार,शेखर आरुण असंख्य कार्यकर्ते,शिक्षण प्रेमी नागरिक याप्रसंगी उपस्थित होते.
जाहिरात 👇👇👇
ताज पॅलेस & हॉल