बीड : राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने बीड येथे ओबीसी, व्हीजेएनटी समाज बांधवांचे भव्य अधिवेशन व आरक्षण बचाव निर्धार मिळावा येत्या रविवार दि.२६ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगनराव भुजबळ यांच्या हस्ते होणार असून बहुजन कल्याण मदत व पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचे या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. तरी या मेळाव्यास ओबीसी, व्हीजेएनटी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आहिल्या महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस मीनाक्षीताई देवकते यांनी केले आहे.
ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी, मंडल आयोगाची प्रभावी अंमलबजावणी करावी, केंद्र सरकारने संविधानाच्या कलम २४३ डी /६ आणि २४३ टी /६ मध्ये सुधारणा करून देशातील सर्व ओबीसींना २७ टक्के राजकीय आरक्षण मिळवून द्यावे या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी आयोजित केलेल्या या मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे, भाजपाच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजाताई मुंडे, माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली सदरील भव्य मेळावा संपन्न होणार आहे. तर आ. राजेश राठोड, आ. महादेव जानकर, आ. संदीप क्षीरसागर, बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी, माजी आ. भीमसेन धोंडे, माजी आ. नारायणराव मुंडे, माजी आ. रामराव वडकुते, कुंभार समाजाचे प्रदेशाध्यक्ष सतीश दादा दरेकर, ओबीसीच्या ज्येष्ठ नेत्या प्रा. सौ. सुशीलाताई मोराळे, समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष ॲड. सुभाष राऊत, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय महासचिव प्रा.पी. टी. चव्हाण, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे, महासचिव सचिन राजूरकर, युवा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष घाटे, प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश भागरथ, युवा प्रदेशाध्यक्ष चेतन शिंदे, कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष श्याम लेडे, महासंघाच्या महिला अध्यक्ष कल्पनाताई मानकर, सत्यशोधक ओबीसी परिषदेचे राज्याध्यक्ष संदीप उपरे, माळी महासंघाचे राज्य प्रवक्ता प्रा. लक्ष्मण गुंजाळ, गोल्ला गोलेवार समाज प्रदेशाध्यक्ष नामदेवराव आयलवार, एस. बी. सी. समाज प्रदेशाध्यक्ष शशिकांत आमने, धनगर समाज कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अंकुशराव निर्मळ,धारूरचे माजी नगराध्यक्ष माधवराव निर्मळ, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम जहांगीर, परीट समाजाचे प्रदेशाध्यक्ष गणेश जगताप, भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष जे. डी. शाह, मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष इंजि. विष्णू दादा देवकते, संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती महोत्सवाचे संस्थापक ॲड. संदीप बेदरे, सोनार समाज युवा प्रदेशाध्यक्ष मंगेशराव लोळगे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब पांचाळ, बारा बलुतेदार संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष प्रकाश दादा कांनगावकर यांच्यासह ओबीसी, व्हीजेएनटी समाजातील सर्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
तरी बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कॅनॉल रोड बीड येथे रविवार दि.२६ सप्टेंबर २०२१ रोजी ११:३० वाजता संपन्न होणाऱ्या ओबीसी, व्हीजेएनटी समाजबांधवांच्या भव्य आरक्षण बचाव निर्धार मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आहिल्या महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस मीनाक्षीताई देवकते यांनी केले आहे.
जाहिरात 👇👇👇
ताज पॅलेस & हॉल