HomeUncategorizedगळा चिरून पत्नी,दोन वर्षीय मुलीची हत्या ? पतीची गळफास घेऊन आत्महत्या, सिरसाळयात...

गळा चिरून पत्नी,दोन वर्षीय मुलीची हत्या ? पतीची गळफास घेऊन आत्महत्या, सिरसाळयात खळबळ पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू..!

सिरसाळा : येथील मोहा रोड परिसरात

एकाच कुटुंबातील दोन जणांची हत्या ? करून कुटुंब प्रमुखाने गळफास घेऊनआत्महत्याकेल्याचीधक्कादायक घटना समोर आली असल्याचेदिसून येत आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपास सुरू केला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहा रोड परिसरात घडलेली ही घटना शुक्रवार दिनांक 24 रोजी रात्री साडे नऊच्या  सुमारास उघडकीस आली. सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा अल्लाबकश शेख याने आपली पत्नी, दोन वर्षीय मुलगी यांची हत्या केली ? आणि गळफास घेऊन त्यानं स्वत:ला संपवलं असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.आरोपी अल्लाबकाश शेख याने त्याची पत्नी , दोन वर्षीय मुलगी यांना गळा चिरून ठार मारले?असा अंदाज वर्तवला जात आहे तर त्यानंतर त्याने स्वतः गळफास लावून घेतला असल्याचे सुध्दा घटना स्थळ बघून दिसून येत आहे.
रात्री  १0 च्या दरम्यान घटनेचे वृत्त शहरात पसरले. त्यानंतर सिरसाळयात प्रचंड खळबळ उडाली.  घटनास्थळी एपिआय प्रदीप एकशिंगे  यांच्यासह पी एसआय, महेश विघ्ने, शेळके, मिसाळ,पो ना अंकुश मेंढके, अर्शद सय्यद, अक्षय देशमुख,पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला. रात्री साडे अकरा वाजेपर्यंत  मृतदेहाची पाहणी तपासणी आणि घटनास्थळाचा पंचनामा करून बॉडी पी एम साठी अंबाजोगाई रुग्णालयात हलविण्यात आली पी एम रिपोर्ट आल्यानंतर संबंधित कुटुंबाकडून जे कोणी तक्रार दाखल करण्यास येईल त्या वेळेस गुन्हा दाखल करण्यात येईल असे यावेळी सिरसाळा पोलिस स्टेशनचे सहा पोलिस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांनी पत्रकारांना बोलताना सांगितले
जाहिरात 👇👇👇
ताज पॅलेस & हॉल

बुकिंग के लिए संपर्क :- मोमीन सिराज 8149814902

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments