HomeUncategorizedमाजलगावात एआयएमआयएम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची निवड तर लवूळ येथे शाखेचे धडाक्यात उद्घाटन...!

माजलगावात एआयएमआयएम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची निवड तर लवूळ येथे शाखेचे धडाक्यात उद्घाटन…!

बीड : जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यात एआयएमआयएम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची निवड करून तालुक्यातील पात्रुड पासून जवळच असलेल्या लवूळ या गावी पक्षाच्‍या शाखेचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफिक भाऊ यांच्या हस्ते धडाक्यात करण्यात आले. शफिक भाऊ शहरासह ग्रामीण भागातही शाखा स्थापन करून पक्षाचे जाळे घट्ट विणू लागले आहे.

बीड जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील गावागावांमध्ये पक्षाची शाखा स्थापन करण्याचे कार्य शफीक भाऊंनी हातात घेतले असून जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये एकामागे एक शाखा स्थापन करून पदाधिकाऱ्यांची निवड करीत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात नवनवीन कार्यकर्ते पक्षात प्रवेश करीत असून काही ठिकाणी तर इतर पक्षातील कार्यकर्त्यांसह पदाधिकारीही एआयएमआयएम पक्षात प्रवेश करीत असल्याचे चित्र सगळीकडे दिसून येत आहे. यामुळे पक्षीय पातळीवर कार्यकर्त्यांची, पदाधिकार्‍यांची संख्या तर वाढतच आहे, शिवाय सर्वसामान्य जनता ही पक्षासोबत मोठ्या प्रमाणात जोडली जात आहे. संघटन मजबूत करण्यावर भर देत असल्याने शफिक भाऊ पायाला भिंगरी बांधल्यासारखे दिवस उजाडल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत जिल्हाभर संचार करीत आहेत. नुकतेच लवूळ या गावात सुद्धा त्यांनी जुने-नवे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह भेट देऊन पक्षाची शाखा स्थापन केली. या शाखा स्थापनेच्या उद्घाटन समारंभामध्ये नवनिर्वाचित स्थानिक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खा. बॅरिस्टर अल्हाज़ असदुद्दीन ओवैसी, ज्येष्ठ नेते अकबरुद्दीन ओवैसी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा खा. इम्तियाज जलील, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. अब्दुल गफ्फार कादरी, मराठवाडा विभागाध्यक्ष फिरोज लाला आणि जिल्हाध्यक्ष शफिक भाऊ यांच्या नावाने कार्यकर्ते मोठ्या उत्साहात जयघोष करत घोषणा देत होते.
यावेळी माजलगाव तालुका उपाध्यक्ष अन्सार भाई शेख, माजलगाव युवक तालुका अध्यक्ष समशेर भाई, युवक शहराध्यक्ष सोहेल अत्तार, युवक शहर उपाध्यक्ष अलीम भाई शेख, पिपलगाव सर्कल अध्यक्ष मजहर शेख, भाटवडगाव सर्कल अध्यक्ष हकिम भाई, केसापुरी कॅम्प सर्कल अध्यक्ष वसीम खान, लवुल सर्कल प्रमुख सादेख भाई, शाखा प्रमुख शेख तौफीक, सर्कल अध्यक्ष शेख सादेख, सर्कल उपाध्यक्ष शेख अज़हरमिया, सचिवपदी शेख ताज, उपसचिव शेख जावेद, कोषाध्यक्ष शेख एजाज अध्यक्ष शेख अलीम यांची पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली. यावेळी शफीक भाऊंसह, हाजी अय्युब पठाण, शेख एजाज़, खन्ना भैय्या, सोफीयान मनियार, सिध्दीख भैय्या यांची प्रमुख उपस्थिती होती. अॅड. शेख शफीक भाऊंच्या नेतृत्वाखाली आणि तालुकाध्यक्ष इद्रीस पाशा, जिल्हा उपाध्यक्ष – शेख युसूफ यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा मोठ्या धडाक्यात पार पडला.
जाहिरात 👇👇👇

ताज पॅलेस & हॉल

बुकिंग के लिए संपर्क :- मोमीन सिराज 8149814902

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments