HomeUncategorizedसराटे वडगाव येथे आय सी आय सी आय फाउंडेशन मार्फत झालेल्या नदी...

सराटे वडगाव येथे आय सी आय सी आय फाउंडेशन मार्फत झालेल्या नदी खोलीकरण कामाचे जलपूजन..!

आष्टी : पठाण शाहनवाज 

आष्टी तालुक्यातील सराटे वडगाव येथे आय सी आय सी आय फाउंडेशन मार्फत झालेल्या नदी खोलीकरण कामाचे जलपूजन मा.तहसीलदार कदम साहेब यांच्यामार्फत करण्यात आले. एप्रिल 2021 मध्ये फाउंडेशन मार्फत मराठवाड्यामध्ये प्रथमच नदी खोलीकरणाच्या कामाची सुरुवात करण्यात आली. त्यामध्ये फाउंडेशन मार्फत 4:40 लक्ष रुपये व गावकऱ्यांचा लोकसहभाग म्हणून 2.00 लक्ष रुपये लोकवाटा अशा पध्दतीने प्रकल्प चालू करण्यात आला. सराटे वडगाव येथील पाणलोटाचे काम हे यापूर्वी गावकऱ्यांनी लोकसहभागातून पूर्ण केले होते पण त्या कामाचा कळस म्हणून राहिलेल्या 500 मीटर नदी खोलीकरण हे काम शिल्लक होते व ते काम फाऊंडेशन व सराटे वडगाव ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून पूर्ण करण्यात आले.सदर कामातून 6 कोटी लिटर पाणी साठा ग्रामस्थांसाठी उपलब्ध झाला आहे.व तसेच या कामाचे वैशिष्ट्य म्हणजे सदर कामाच्या दुतर्फा फाउंडेशन व ग्रामस्थांच्या मदतीने विविध ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या झाडांची वृक्ष लागवड केली आहे व मातीची धूप रोखण्यासाठी नदीच्या काठावर स्टायलो गवत लावले आहे. सदर कार्यक्रमास मा. राजाभाऊ कदम तहसीलदार साहेबांनी आयसीआयसीआय फाउंडेशन व ग्रामस्थांच्या कामाचे कौतुक केले. व तसेच फाऊंडेशनच्या विविध कार्यक्रमाची माहिती करून घेतली व त्यामधील पर्यावरण पूरक कार्यक्रमाचे कौतुक केले. आय सी आय सी आय फाऊंडेशनचे मराठवाडा विभागाचे प्रकल्प व्यवस्थापक मा. दीपक पाटील यांनी गावकऱ्यांनी फाऊंडेशनच्या विविध कार्यक्रमात सहभागी होऊन व फाऊंडेशनच्या कामाला चालना देण्याचे काम व इतर गावांना मार्गदर्शन करण्याचे काम केले असे कौतुक केले.
मा.प्रा.राम बोडखे सरपंच यांनी 
या कार्यक्रमाप्रसंगी मा .राजाभाऊ कदम साहेब तहसीलदार आष्टी, मा.गोरक्ष तरटे ता. कृषी अधिकारी , मा.दीपक पाटील ICICI FOUNDATION प्रकल्प व्यवस्थापक, मा.चेतन पाटोळे ICICI FOUNDATION जिल्हा विकास अधिकारी , तालुका समन्वयक यशवंत बहिरम , मा.विक्रम पोकळे शिक्षणाधिकारी, सरपंच प्रा.राम बोडखे सर, मा.संदिप सुंबरे, पत्रकार मा उत्तम बोडखे साहेब, पाणी फाउंडेशन समन्वयक मा. कैलास पन्हाळकर ,मा .धोंडे साहेब आत्मा ,उपसरपंच महादेव शिंदे ,प्रा.ईश्वर ननावरे, प्रा.संदिप ननावरे सर,जयदिप ननावरे ,आसिफ शेख ,मोहन कापरे व सराटेवडगाव ग्रामस्थ उपस्थित होते.
जाहिरात 👇👇👇

ताज पॅलेस & हॉल

बुकिंग के लिए संपर्क :- मोमीन सिराज 8149814902

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments