आष्टी/शाहनवाज पठाण महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई , बीड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार , आष्टी तालुका विधी सेवा समिती आष्टी तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि २५ सप्टेंबर २०२१ रोजी आष्टी येथील दिवाणी ,फौजदारी न्यायालयाचे प्रांगणात राष्ट्रीय लोक अदालत संपन्न झाली
या लोक अदालतीमध्ये प्रलंबीत दिवाणी, फौजदारी स्वरूपाची १ हजार ९ ५१ प्रकरणे तसेच १६८ ९ दाखलपुर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती , त्यापैकी प्रलंबीत १४१ दिवाणी आणि ५४ फौजदारी तसेच २४८ दाखलपुर्व प्रकरणे असे एकुण ४४३ प्रकरणे निकाली निघाली . या लोक अदालतीमध्ये प्रलंबीत व दाखलपुर्व प्रकरणात ८९ लाख ९ ६ हजार २८८ रुपये वसुल झाले . या लोकअदालतीत तीन पॅनल करण्यात आले होते . पॅनल प्रमुख म्हणुन आष्टीचे दिवाणी न्यायाधीश क स्तर श्री . के . के . माने , बीडचे सह दिवाणी न्यायाधीश ( क स्तर . ) श्री . सी.पी. शेळके व आष्टीचे सह दिवाणी न्यायाधीश ( क स्तर . ) श्री . व्ही.एन. शिंपी यांनी काम पाहीले . राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रलबीत दिवाणी दावे , तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे , घरगुती कौटुंबीक वाद , पोटगी प्रकरणे , बँक कर्जाचे दाखल पुर्व प्रकरणे तसेच ग्रामपंचायतीच्या थकबाकी ची दाखल पुर्व प्रकरणे सामोपचाराने आपसात तडजोडीने निकाली निघाले . या राष्ट्रीय लोकअदालती मध्ये कोरोना बाबतच्या सर्व नियमावलीचे पालन करण्यात आले होते . ही लोक अदालत यशस्वी होण्यासाठी न्यायाधीश , वकील संघाचे पदाधिकारी व सदस्य आणि गट विकास अधिकारी पंचायत समिती आष्टी , ग्रामसेवक आणि बँक अधिकारी , महसुल प्रशासन , पोलीस प्रशासन आणि न्यायालयातील सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले
जाहिरात 👇👇👇 .
ताज पॅलेस & हॉल