बीड : जमीयत ए वलीउल्लाह व ग्लोबल पिस सेंटरचे अध्यक्ष मौलाना कलीम सिद्दीकी यांची अटकेतून सुटका करावी. अशी मागणी एआयएमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊ आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देशाच्या राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, मौलाना कलीम सिद्दीकी यांना एटीएस ने विनाकारण अटक केली असून मौलाना हे शांती आणि एकतेचा संदेश देणारे निष्कलंक व देशातील एक प्रसिद्ध व्यक्तीमत्व आहे. आजपर्यंत त्यांनी देशातील एकता आणि शांतता कायम राहिल यासाठी सदैव प्रयत्न केलेले आहे. एटीएसने त्यांना अटक केली असुन त्यांची तात्काळ सुटका करावी. अशी मागणी एआयएमआयएम पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड.शेख शफीक भाऊ यांच्यासह ज्येष्ठ नेते अब्दुस् सलाम सेठ, हाजी अय्युब पठाण, हाफेज अशफाक, मुफ्ती वाजेद अशरफी, सोफीयान मनीयार, शेख एजाज खन्ना भैय्या, सय्यद इलयास, नईम मेंबर, नवाब शिकलकर, शाकेर सर, रहेमत पठाण, शेख सलमान, शेख रफीक, सय्यद बासेद, शेख आरेफ़ आदींनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देशाच्या राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
एआयएमआयएम करणार महाराष्ट्रासह देशभर आंदोलने
मौलाना कलीम सिद्दिकी यांच्यासारख्या आदरणीय व्यक्तिमत्त्वाला फक्त मुस्लिम द्वेषामुळे सत्ताधारी भाजपने एटीएस ला पुढे करून अटक केली. सत्ताधाऱ्यांची ही कृती कदापिही स्विकार्य किंवा माफी योग्य नाही. जर मौलानांची सुटका करण्यात आली नाही तर एआयएमआयएम पक्ष मुस्लीम धर्मगुरूंच्या आदेशाने महाराष्ट्रासह देश भरात निदर्शने, धरणे आणि मोठ-मोठे मोर्चे काढून मौलानांच्या सुटकेसाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खा. इम्तियाज जलील, राज्य कार्याध्यक्ष डॉ. अब्दुल गफ्फार कादरी आणि मराठवाडा विभागाध्यक्ष फिरोज लाला यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने करेल. असे प्रतिपादन शफिक भाऊंनी केले आहे.
जाहिरात 👇👇👇
ताज पॅलेस & हॉल