HomeUncategorizedतळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारलेल्या डॉक्टरांचे शेकापच्या वतीने...

तळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारलेल्या डॉक्टरांचे शेकापच्या वतीने सहर्ष स्वागत..!

बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) 

रायगड जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तळा येथे नवनियुक्त डॉ गजानंद मोध्ये आणि डॉ संदीप होणसांगले यांची तळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकारी म्हणून शासनाकडून नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे तळा तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तळा तालुका शेतकरी कामगार पक्ष चिटणीस धनराज गायकवाड व तळा तालुक्याचे युवा नेते लहुशेठ चव्हाण आणि तळा तालुका आरडीसी बैंक संचालक ज्ञानेश्वर भोईर यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे सहर्ष स्वागत करून त्यांच्या भावी आरोग्य सेवेस शुभेच्छा दिल्या.

      शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस आणि महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका तळाचे विद्यमान अध्यक्ष श्री. धनराज गायकवाड आणि त्यांच्या सहकारी टीम तळा तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होऊन आपला मानव धर्म जोपासत तालुक्याच्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहून लोकहिताच्या दृष्टीने उल्लेखनीय योगदान आणि भरीव अशी कामगिरी करत आहेत. त्याच बरोबर तालुक्याच्या सर्व सरकारी निमसरकारी क्षेत्रात रुजू होणाऱ्या सर्व अधिकारी वर्गाचे यथोचित स्वागत करुन त्यांच्या जनसेवेच्या कामकाजास सहकार्य करत प्रोत्साहनात्मक शुभेच्छा देत असतात.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments