आष्टी/पठाण शाहनवाज
तालुक्यातील सर्वात मोठे असलेले मेहकरी तलाव आज 100 टक्के भरले असून परिसरातील पाण्याचा प्रश्न मिटला आहे.सतत पडत असलेल्या पावसाने आज मेहकरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले.रात्री झालेल्या पावसाने आज पहाटेच्या सुमारास तलाव ओव्हर फ्लो झाला आहे.मेहकरी पिंपळगाव दाणी पुंडी सराटे वडगाव आनंदवाडी रुई नालकोल शिरापुर बऱ्याच गावांचा भविष्यातील पाण्याचा प्रश्न मिटला असून शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.तसेच पावसामुळे पिंपळा परिसरातील पिकांचेही मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्येकर्ते अमोल काकडे व पिंपळगाव दाणी येथील युवक कार्येकर्ते गोवर्धन ढगे यांनी केली आहे.
जाहिरात 👇👇👇
ताज पॅलेस & हॉल