आष्टी / शाहनवाज पठाण
आष्टी तालुक्यातील शिरापूर येथील शेतकऱ्यांना आष्टी
येथील छत्रपती शाहू फुले कृषी महाविद्यालयातील कृषी कन्या अश्विनी आबासाहेब देवकर
हिने शेतीच्या बांधावर जाऊन ई-
पीक पाहणी संदर्भात प्रत्यक्ष स्वरूपात माहिती देऊन मार्गदर्शन केले.
पारभी ग्रामस्थांनी या कृषी कन्येचे स्वागत केले. प्राचार्य डॉ एस आर अडसूळ कार्यक्रम अधिकारी प्रा एस एल बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी कन्या अश्विनी देवकर हिने शेतकर्यांना
कृषी विषयी माहिती देऊन ई पीक पाहणी कशी करावी याबाबत माहिती दिली.
यासाठी अॅपचा वापर
कसा करावा, याविषयी प्रत्यक्ष बांधावर जाऊन केले.यावेळी बबन कवडे, आबासाहेब देवकर,विवेक धुमाळ,सागर पगारे, बाबासाहेब देवकर,छबा कवडे, सारीका देवकर,मुक्ता कवडे, किरण देवकर,देविदास पगारे,हर्षवर्धन देवकर यांच्यासह आदी शेतकरी उपस्थित होते.
जाहिरात 👇👇👇
ताज पॅलेस & हॉल