आष्टी/शाहनवाज पठाण
तालुक्यातील विविध प्रश्नांवर अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे झालेले नुकसान, शाळा सुरू करणेबाबत तसेच आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाबत मुंबई कृष्णकुंज येथे राज ठाकरे व अमित राज ठाकरे यांच्याशी आष्टीच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. आष्टी तालुक्यात मनसेची विचारधारा व पक्ष बळकट करण्यासाठी कुशल रणनीती आखून मनसे पूर्ण ताकतीने निवडणुक लढवणार आहे .याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली .या प्रसंगी युवकांना पक्षामध्ये महत्वपुर्ण स्थान असल्याने , संघटन कौशल्य मजबुत करणे कामी अमित ठाकरे यांच्या बरोबर चर्चा करण्यात आली. तसेच शेतकर्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.अतिव्रष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही शिष्टमंडळाने केली.तसेच थोड्याच दिवसात आष्टी तालुका मनसेच्या वतीने 1000 शेतकऱ्यांना खतवाटपाचा संकल्प व्यक्त करुन राज ठाकरेंनी खतवाटपासाठी आष्टीत यावे असा आग्रह केला असता मा.राजसाहेबांनी थोड्याच दिवसात तारीख कळवू असे आश्वासन दिले.याप्रसंगी मनसेचे आष्टी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब मेटे, शेतकरी सेनेचे कैलास दरेकर,तालुकाध्यक्ष बाबासाहेब दिंडे, तालुका सचिव बाबासाहेब झांबरे, सोपान मोरे,उपाध्यक्ष मच्छिंद्र गर्जे, अनिल जाधव,राज खेडकर, सुनिल पाचपुते,सुरज गिते, रोहिदास गावडे, सचिन सटाले, शरद गांगर्डे,राजेश नन्नवरे,कानिफ क्षिरसागर,विजय काळे आदी मनसैनिक उपस्थित होते.
जाहिरात 👇👇👇
ताज पॅलेस & हॉल