संग्रामपुर मकसूद अली
तालुक्यात गेल्या १ महिण्या पासुन सतत सुरु असलेल्या पावसाने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले सोयाबीन ,उळीद , ज्वारी तिळ , काढणीसाठी तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिराऊन घेतला अतिवृष्ठीमुळे सोयाबीन शेंगात कोंब फुटले तर उळीद तिळ मक्का ज्वारीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने संग्रामपुर तालुका ओला दुष्काळ म्हणुन घोषीत करुन शासनाने तालुक्यातील शेतकऱ्याना आर्थिक मदत द्यावी अशी मांगणी भाजपा तालुकाध्यक्ष लोकेश राठी यांच्या नेतृत्वात तहसिलदार वरणगावकर यांच्या मार्फत मुख्यमंत्रीकडे भाजपाने केली आहे
मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात नमुद आहे कि सतत मुसळधार अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले गेल्या वर्षी दुष्काळ पडला होता परंतु शेतकऱ्यांना फुटी कवडीची मदत मिळाली नाही त्यात यावर्षी हि ढगफुटी अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन कपाशी तुर ज्वारी तिळ मक्का पिकांचे १००% नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त हवालदिल झाल्याने शासनाने ओला दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मांगणी भाजपा जि उपाध्यक्ष जानराव देशमुख तालुकाध्यक्ष लोकेश राठी , किसान आघाडी जि उपाध्यक्ष भारत वाघ , गजानन दाणे , विलास इंगळे , सेनानिवृत मुख्यध्यापक रमेश राजनकर , अविनाश धर्माळ , नदिम खान , श्रीकृष्ण भालतिडक , शेख साबीर , सुनिल दातार , पदमाकर मोरे , ज्ञानेश्वर फाळके , आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केली आहे
जाहिरात 👇👇👇
ताज पॅलेस & हॉल