आष्टी / पठाण शाहनवाज
आष्टी तालुक्यात अतिवृष्टीमुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुन्हा संततधार पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बळीराजाने कबाडकष्ट करून पोटच्या लेकराप्रमाणे जपलेले व पिकवलेले मोत्यासारखे पीक त्यांच्याच डोळ्यासमोर वाया गेले. रात्रंदिवस पडत असलेला संततधार पावसामुळे बळीराजाचा पिकाचे होत्याचे नव्हते झाले आहे. यामुळे आष्टी तालुक्यात खरीप पिकांचा संपूर्ण हंगाम वाया गेला आहे या अस्मानी संकटामुळे बळीराजाच्या शेतात पाणी आणि डोळ्यात सुद्धा पाणी आले आहे. या शेतकऱ्यांकडून शेतीचे सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी.
सोयाबीन, उडीद,कांदा, कडधान्य पिकांची लागवड करण्यात आली होती. शेती पिकवण्यासाठी बळीराजाने विविध प्रकारची कर्ज काढून काळया आईची कूस उजवली याच कर्जातून घर संसाराचा गाडा पुढे नेत उगवलेल्या पिकांचे बाळातपण करण्यात आले यामध्ये खुरपणी, पाली ,रासायनिक खते ,किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशके मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला .आता कुठे उत्पादनास सुरवात होणार तोच अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले या दरम्यान हातातोंडाशी आलेला घास नियतीने हिरावून घेतला शेतकरी अस्मानी संकटात पुरता गुरफटला गेला आहे .सगळ्या जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याकडे पाहिले जाते असताना आता त्याची बिकट अवस्था बनली आहे या अस्मानी संकटात आधार देण्यासाठी सरकार ने तात्काळ ओला दुष्काळ जाहिर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहिर करावी,असे दक्ष पत्रकार संघाचे आष्टी तालुकाध्यक्ष अमजद भाई शेख यांनी प्रसिद्धि पत्रकाद्वारे केली आहे.
जाहिरात 👇👇👇
ताज पॅलेस & हॉल