संग्रामपुर [ मकसूद अली ]
तालुक्यातील पातुर्डा येथील मजुर वर्ग शेतीवर अवलंबुन असुन अतिवृष्टी झाल्यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने होत्याचे नव्हते झाले शेतकरी हवालदिल झाला शेती संबंधीत कामेच नसल्याने मजुर वर्गाच्या हाताला कामे नसल्याने शेत मजुरावर उपास मारीची वेळ आली रोजगार हमी योजने अंतर्गत पातुर्डा ग्रा प मार्फत कामे सुरु करण्याची मांगणी वंचीत बहुजन आघाडी पदाधिकारी सह बहुसंख्यांक महिला पुरुष मजुर वर्गाने पातुर्डा ग्रामविकास अधिकारी एस पी मेहेंगे यांच्या कडे निवेदनाव्दारे केली आहे निवेदनात नमुद आहे कि पातुर्डा सह परिसरात कोद्री आवार कुंदेगाव आस्वंद टाकळी पंच आदि गावातील मजुर वर्ग शेतीवर अवलंबुन असल्याने या परिसरात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले उळीद तिळ मक्का अक्षरशा शेतातच सडले शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने शेतात गवंत वाढले मात्र पैसा अभावी निंदन इतर कामे प्रभावित झाल्याने शेतमजुरांना कामेच नसल्याने रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रा प मार्फत कामे सुरु करुन मजुर वर्गाना कामे उपलब्ध करुन द्यावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा एका निवेदनाव्दारे दिला आहे यावेळी रमेश वानखडे , बाळू अजनकार , बाळकृष्ण वानखडे ,युवराज वानखडे , दिनेश वानखडे , शेख सुलतान , गणेश वानखडे प्रकाश वानखडे आदि बहुजन वंचीत आघाडी पदाधिकारी व बहुसंख्यांक महिला पुरुष मजुर उपस्थीत होते
जाहिरात 👇👇👇
ताज पॅलेस & हॉल