आष्टी / पठाण शाहनवाज
तालुक्यातील कडा येथील श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे श्रीमती एस के गांधी महाविद्यालय कडा येथे ‘हिंदी दिना’चे औचित्य साधून सोमवार दिनांक २७ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर २०२१ या दिवशी
संस्थेचे पदाधिकारी कांतीलाल चानोदिया, हेमंतकुमार पोखरणा, गोकुळदास मेहेर, योगेश भंडारी, अनिलकुमार झाडमुत्था, डॉ उमेश गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन व्याख्यान मालाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नंदकुमार राठी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक हिंदी विभाग प्रमुख प्रा डॉ विष्णू गव्हाणे यांनी तर बहारदार सुत्रसंचालन प्रा डॉ किशोर चौधरी यांनी केले. व्याख्यात्यांचा परिचय प्रा डॉ टाळके ए.बी. तसेच प्रा डॉ काझी तन्वीर मॅडम यांनी करून दिला. सोमवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी डॉ गोरख काकडे (एस बी महाविद्यालय औरंगाबाद) यांनी ‘हिंदी भाषा की सार्वत्रिकता’ या विषयावर व्याख्यान दिले. मंगळवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी डॉ सचिन गपाट (मुंबई विद्यापीठ मुंबई) यांनी ‘हिंदी का वैश्विक परीदृश्य और रोजगार की संभावना’ या विषयावर व्याख्यान दिले तर बुधवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी प्रो सुधाकर शेंडगे (डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद) यांनी ‘लोकल से ग्लोबल तक’ या विषयावर व्याख्यान दिले. या तीन दिवशीय ऑनलाईन व्याख्यान मालेला विद्यार्थी पालक प्राध्यापक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ ज.मो. भंडारी यांनी मानले.
जाहिरात 👇👇👇
ताज पॅलेस & हॉल