आष्टी / पठाण शाहनवाज
कुटुंबियातील व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर त्यांच्या आठवणी चिरंतर राहण्यासाठी कोणी समाधी बांधतात तर कोणी मंदिरे बांधतात आष्टी तालुक्यातील गहुखेल येथील जगताप कुटुंबियांनी कै.शिवाजी जगताप यांच्या मृत्यूनंतर त्यांची रक्षा नदीत विसर्जीत न करता वृक्षारोपण करून ती रक्षा त्या झाडांच्या मुळाशी टाकून आपल्या कुटुंबियातील व्यक्तीची स्मृती जोपासण्याचा एक नवा पायंडा पाडला आहे .
आष्टी तालुक्यातील विधान परिषद सदस्य सुरेश धस यांचे स्विय सहाय्यक गहूखेल येथील सुभाष जगताप यांचे ज्येष्ठ बंधू कै.शिवाजी जगताप यांचे नुकतेच निधन झाले कै.शिवाजी जगताप यांना झाडे लावण्याचा व शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याचा छंद होता त्यांची झाडाबद्दल असणारे प्रेम लक्षात घेऊन सुभाष जगताप व त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची रक्षा विसर्जित न करता तेरवीच्या दिवशी गावरान जातीची आंब्याचे व इतर वृक्षाचे रोपण करण्यात आले. जगताप कुटुंबियांचा उद्देश हा होता की कै. शिवाजी जगताप यांचे रक्षा नदीत विसर्जित करण्यापेक्षा त्यांचा उपयोग त्या झाडांना खत म्हणून उपयोग होईल कै. शिवाजी जगताप यांचे झाडांविषयी असणारे प्रेमही जोपासण्याचे कार्य होईल पण या झाडाकडे आपल्या लक्ष न जाईल त्यावेळेस आपल्या कुटुंबातील कै. शिवाजी जगताप यांची स्मृती कायम राहावी या उद्देशाने लावलेल्या झाडांना फळे आल्यानंतर ती फळे गोरगरिबांना मोफत वाटण्याचा जगताप कुटुबियांचा मानस वृक्षारोपण प्रसंगी व्यक्त केला आहे. याप्रसंगी पंचायत समिती सभापती बद्रीनाथ जगताप माजी प.स.सभापतीअशोक इथापे माजी जि.प. सदस्य सुखदेव खाकाळप.स सदस्य रमेशदादा तांदळे,रावसाहेब लोखंडे,अशोकराव मुळे,ह.भ.प मगर सर माजी विवेकानंद पतसंस्थेचे उपाध्यक्ष मोहन जगताप ,रावसाहेब सिरसाठ,तळेकर आबा,आप्पा बरडे, भिमराव शेकडे,आजीनाथ शेकडे,संताराम शिरसाठ, शेकडे फैाजी,दिपक वामन, बाळासाहेब पवळे,रोहिदास शेकदे, आबा गव्हाने ,दिलिप शिंदे, भाउ गव्हाने,अशोक कर्डिले ,क्रष्णा शेकडे.वि. भा सांळुके महादेव आमले रामेश्वर सुबे व ईतर उपस्थीत होते
जाहिरात 👇👇👇
ताज पॅलेस & हॉल