संग्रामपूर [ मकसूद अली ]
तालुक्यातील पातुर्डा परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई व घरांची पडझड नागरिकांना तात्काळ मदत द्या अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा संग्रामपूर तहसिलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांना दिलेल्या निवेदनातुन शासनाला दिला आहे. निवेदनात असे नमुद केले आहे की,संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा परिसरात झालेल्या ढगफुटी मुळे परिसरातील आवार, कोद्री,उकळी,वानखेड येथे पूर परिस्थिती उदभवून शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले तसेच सतत पावसामुळे तालुक्यातील अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली, ज्या शेतकऱ्यांच्या घरांचे नुकसान झालेले आहे त्यांना तात्काळ लाखाची मदत द्यावी अनेक शेती खरडून गेली,तरी शासन स्तरावर तात्काळ पंचनामे करून शासनाने बाधीत शेतकऱ्यांना एकरी ५० हजर रुपये मदत द्यावी दिरंगाई केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी मनसे तालुका अध्यक्ष शिवा पाटील खोंड तालुका उपाध्यक्ष अरुण धर्माळ,विठ्ठल पिंजरकार , पवन शेंडे ,सचिन सिरस्कार,शुभम चिकटे ,उमेश पाखरे, श्रीराम पाटील खोंड, नितीन खापरे,पवन सुके,मनोज ढगे, शाम नकाटे ,पंकज गावंडे,शेख अनिस ,गणेश नांदोकार, मधुकर पुंडे,रितेश राऊत,अतुल बघे मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. .
जाहिरात 👇👇👇
ताज पॅलेस & हॉल