संग्रामपुर [ मकसूद अली ]
तालुक्यातील पातुर्डा मंडळ अंतर्गत आवार कोद्री टाकळी पंच कुंदेगाव आस्वंद उकळी येथे २४ सप्टेंबर रोजी ढगफुटी झाली मुसळधार अतिवृष्टीमुळे सोयाबीन उळीद तिळ मक्का पिक शेतातच जमा झाले तर आवार पातुर्डा सह तालुक्यात गाव निहाय कपाशीच्या बोंड्या काळ्या पडून अक्षरशा सडल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने जगाचा पोशिंदा आर्थिक संकटात सापडला चिंताग्रस्त हवालदिल झाला आहे सतत सुरु असलेल्या पावसाने खरीप शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले बहुताश शेतकरी पिक कर्ज माफी पासुन वंचीत त्यात बॅकांशी नविन पिक कर्जाला मज्जाव गेल्या वर्षीचा पिक विमा अदयापही मिळाला नाही व या वर्षी निर्सगाची अकृपा अतिवृष्टीने झालेले अतोनात नुकसान त्यामुळे शेतकऱ्यांचा अश्रृचा बांध फुटला पुर्वीच उसनवार दाग दागिने गहाण विकुन कसे तरी खरीप पेरणी केली अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे नुकसान उसनवार घेतलेले व गहाण दाग दागीने परत फेड कसे करावे त्यात पाल्याचे शिक्षण व प्रपंच कसा चालवायचा याची चिंता हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मांगणी नुकसान ग्रस्त शेतकरी कडून होत आहे
जाहिरात 👇👇👇
ताज पॅलेस & हॉल