संग्रामपूर [ मकसूद अली ]
वरवट बकाल येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री जयंती व महाविद्यालयाचा 27 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जगन्नाथ चौधरी, प्रमुख पाहुणे म्हणून संस्कृतिक समितीचे समन्वयक प्रा. डॉ. राजेंद्र कोरडे, राष्ट्रीय सेवा योजनचे कार्यक्रम अधिकारी प्रा. आनंद धुंदाळे व इतर मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दोन्ही महामानवांच्या प्रतिमेस पुष्पअर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. सांस्कृतिक समितीचे समन्वयक डॉ. राजेंद्र कोरडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. महाविद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त महाविद्यालयाची सुरुवात व वाटचाल याविषयीची सविस्तर माहिती डॉ. कोरडे यांनी दिली. वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. संतोष म्हसाळ व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ सतीश राणे यांनी याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जगन्नाथ चौधरी यांनी अध्यक्षीय समारोप केला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनातील विचार तसेच लालबहादूर शास्त्री यांचा ‘जय जवान जय किसान’ या घोषवाक्याचे महत्व विषद केले. महाविद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या व महाविद्यालयाची शैक्षणिक वाटचाल संविस्तपणे सांगितली संचालन प्रा. नागेश इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. निशिगंध सातव यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व अध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, राष्ट्रीय योजनेचे स्वयंसेवक बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
जाहिरात 👇👇👇
ताज पॅलेस & हॉल