आष्टी / पठाण शाहनवाज
शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा येथे शनिवार दिनांक २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ कैलास वायभासे, स्टाफ सेक्रेटरी प्रा निसार शेख, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख डॉ उस्मानखान पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ रमेश खिळदकर यांनी तर उपस्थितांचे आभार किरण कर्डीले यांनी मानले. या कार्यक्रमाला डॉ संजय झांजे, प्रा विवेक महाजन, प्रा ज्ञानेश्वर आम्रीत, प्रा अजिनाथ गिलचे, प्रा सतीश तागड, प्रा गिर्ऱ्हे, प्रा मोहोळकर, श्री जालिंदर काळे, श्री प्रल्हाद खोटे आदी उपस्थित होते. यावेळी महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
जाहिरात 👇👇👇
ताज पॅलेस & हॉल