संग्रामपुर [ मकसूद अली ]
महसुल विभागामार्फत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीकृत ७/१२ महात्मा गांधी जयंती निमित्त़ मोफत ७/१२ मोहिमेचा सर्व प्रथम संग्रामपुर तहसिल कार्यालयात उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांच्याहस्ते करण्यात आला.हयावेळी नायब तहसिलदार विजय चव्हाण ,निवासी ना.तह. डॉ.प्रविणकुमार वराडे, तलाठी,मंडळधिकारी उपस्थित होते.
संग्रामपूर तालुक्यातील प्रत्येक मंडळातील एका गावात या योजनेचा शुभारंभ करण्याबाबत नियोजन करण्यात आले हयावेळी शेतकऱ्यांना मोफत ७/१२ वाटप करुन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती पासून महसूल विभागामार्फत जनजागृतीकरीता शेतकरी खातेदार यांना मोफत सुधारित डिजिटल स्वाक्षरीत सातबारा वाटप शुभारंभ प्रसंगी नायब तहसिलदार वराडे ,मंडळ अधिकरी चामलाटे , तलाठी रियाज शेख , तलाठी रंगदळ व शेतकरी उपस्थीत होते