HomeUncategorizedधानोरामध्ये ई-पीक पाहणीचे कृषी दूतने केले मार्गदर्शन

धानोरामध्ये ई-पीक पाहणीचे कृषी दूतने केले मार्गदर्शन

आष्टी / शाहनवाज पठाण

आष्टी तालुक्यातील धानोरा येथील शेतकऱ्यांना आष्टी
येथील छत्रपती शाहू फुले कृषी महाविद्यालयातील कृषी दूत सुहास नामदेव चव्हाण याने शेतीच्या बांधावर जाऊन ई-
पीक पाहणी संदर्भात प्रत्यक्ष स्वरूपात माहिती देऊन मार्गदर्शन केले. 
धानोरा ग्रामस्थांनी या कृषी दूतचे स्वागत केले. प्राचार्य डॉ एस आर अडसूळ कार्यक्रम अधिकारी प्रा एम ए आजबे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी दूत सुहास नामदेव चव्हाण याने शेतकर्‍यांना 
कृषी विषयी माहिती देऊन ई पीक पाहणी कशी करावी याबाबत माहिती दिली. 
यासाठी अॅपचा वापर
कसा करावा, याविषयी प्रत्यक्ष बांधावर जाऊन केले.यावेळी शेतकरी संदीप तरटे, राहुल काळे , विशाल पवार तुषार उंबरे ,ओम म्हस्के इ, यांच्यासह आदी शेतकरी उपस्थित होते.
जाहिरात 👇👇👇

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments