संग्रामपुर [ मकसूद अली ]
कोरोना लढाईतील विजय समोर दिसत असताना केमिस्ट संघटनेच्या वतीने तालुका स्तरावर फार्मासिस्टचा कोरोना वारिअर म्हणून सत्कार केला. संग्रामपूर येथे साई हाॅल मध्ये बुलडाणा जिल्हा केमिस्ट व ड्रगीस्ट संघटनेच्या वतीने फार्मासिस्टचा कोरोना वारिअर म्हणुन सन्मान कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी केमिस्ट संघटनेच्या मानद सचिव अनिलबाबू नावंदर, औषधी निरिक्षक गजानन घिरके, जिल्हाध्यक्ष राजेंद्र नहार, जिल्हा सचिव गजानन शिंदे, गणेश बंगाले व्यासपिठावर उपस्थित होते.
जेष्ठ फार्मासिस्ट मदनलाल पालीवाल, विजय संघानी, श्रीकृष्ण वडोदे, यांनी पन्नास वर्षे या क्षेत्रात सेवा दिली त्यांची सुवर्णसेवा गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर तालुक्यातील सर्व सभासदांना कोरोना वारिअर चे प्रमाणपत्र व ऍप्रान देऊन गौरवण्यात आले.संचालन गोपाल गांधी यांनी केले. केमिस्ट हा आरोग्य सेवेतील महत्वाचा घटक आहे. कोरोना कालावधीत पूर्णवेळ सेवा दिली, दरम्यान एकाही रूग्णाचा औषधाअभावी मृत्यु झाला नाही. असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. यशस्वीतेसाठी जिल्हा सदस्य पांडुरंग ईगळे, तालुकाध्यक्ष प्रमोद टाकळकर, रडियस फार्माचे वैभव एदलाबादकर, एज बायोटेकचे स्वप्निल गाडगे यांच्यासह संग्रामपूर फार्मा युनिट ने यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. हा महाराष्ट्रातुन पहिला सत्कार समारंभचा मान संग्रामपूर ला मिळाला. महाराष्ट्र फार्मसी कौंशिल चा महाराष्ट्रातून पिसीसी अभ्यासक्रम सुद्धा संग्रामपूर ने शंभर टक्के राबवला. असे मिडीया प्रभारी गणेश बंगाले यांनी जाहीर केले.
कोरोना महामारीत केमिस्ट संघटनेच्या प्रत्येक सभासदाने पूर्ण वेळ सेवा दिली. शासनाने सत्कार केला नाही, विमा कवच दिले नाही. अशा वेळी संघटना पुढे आली. घाबरू नका पण काळजी घ्यावी. तसेच शासनाने केमिस्टांच्या सेवेचे स्मरण ठेवावे अशी अपेक्षा अनिलबाबू नावंदर यांनी व्यक्त केली यावेळी तालुक्यातील फार्मासिस्ट श्याम देशमुख हेमंत भुतडा , उमेश धर्माळ , मुन्ना राठी , शेख खालीद सह सर्व सभासद उपस्थित होते.
जाहिरात 👇👇👇