आष्टी /पठाण शाहनवाज
पारोडी ता आष्टी येथील विकास सायंबर ने राष्ट्रीय युवा अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
विकास नवनाथ सायंबर या तरुणाने गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय युवा क्रीडा स्पर्धेमध्ये 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. त्याने हे अंतर 22.70 सेकंदाची वेळ देत पूर्ण केले .याअगोदर दिल्ली येथे झालेल्या युवा क्रीडा स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक मिळवले होते. विकास सायंबर याची नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड निश्चित झालेली आहे. तेथे तो आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणारा आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विकास ने हे यश संपादन केले आहे .याबद्दल त्याचे पारोडी गावचे सरपंच श्री. भानुदास सायंबर उपसरपंच श्री प्रकाश परकाळे, सह सर्व सदस्य, मुख्याध्यापक डॉ. सतीश सायंबर प्रा. राम बोडखे सर क्रीडाप्रेमी पै.बाळासाहेब शेंदुरकर सर सह संपुर्ण आष्टी तालुक्यातील खेळाडू, शिक्षक, मिञपरिवार, पारोडी ग्रामस्थांकडून त्याचे अभिनंदन करण्यात आले . नेपाळमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याला सुवर्णपदक पटकाविण्यासाठी शुभेच्छा दिल्या .