आष्टी/पठाण शाहनवाज
तालुक्यातील शेडाळा येथे चिकन गुनियाच्या साथिने थैमान घातले आहे .या रोगाने गावाला विळखा घातला आहे.या रुग्णांवर तिसगाव सावरगाव सह खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या परिसरात अतिवृष्टी झाली होती,व सध्या रोजच पावसाने थैमान घातले आहे . त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. हवामान व पाणी खुपचं खराब झाले आहे ,त्यातच मच्छर चे प्रमाण ही वाढले आहे.त्यामुळे साथीच्या आजारांनी डोक वर काढले असुन नागरिक त्रस्त झाले आहेत. आधी कोरोना ,मग सर्दी ताप व आता चिकन गुनिया यामुळे ग्रामस्थांचा जीव मेटाकुटीला आला आहे.अरोग्यय खात्याने मात्र या कडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याने हा आजार आणखीनच वाढत चालला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने वेळीच लक्ष देउन ही साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे अशी मागणी सरपंच सौ.संगिता सरतापे यांनी केले आहे . — नागरीकांनी घाबरून जाऊ नये, खबरदारी चा उपाय म्हणून आवश्यक तेवढेच पाणी साठवणे गरजेचे आहे.स्वछतेच पालण केले पाहिजे, स्टेराॅईड औषधे घेऊ नये, योग्य उपचाराने चिकन गुनिया लवकर बरा होतो. डॉ.नवनाथ म्हस्के, खाजगी डॉक्टर सावरगाव )