आष्टी / पठाण शाहनवाज
आष्टी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांचा नुकसानीचा पंचनामा न करता सरसकट 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी मनसेचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब मेटे यांनी तहसिलदार आष्टी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. शेतकऱ्यांच्या भावनांशी न खेळता झालेल्या अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झाले असून शेतकरी पुर्ण हवालदिल झाला आहे. सरकार पंचनामे कसले करत बसले आहे पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई लवकर दिली नाही तसेच पिकविमा मंजूर न केल्यास 1 नोव्हेंबर रोजी मनसे च्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. याप्रसंगी मनसे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब मेटे तालुका उपाध्यक्ष अनिल जाधव तालुका शेतकरी संघटना बाबासाहेब दिंडे तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब झांबरे, रोहिदास गावडे उपस्थित होते.
जाहिरात 👇👇👇