HomeUncategorized🇮🇳"आजादी का अमृत महोत्सव" पारगाव शाळेमध्ये झाला साजरा🇮🇳

🇮🇳”आजादी का अमृत महोत्सव” पारगाव शाळेमध्ये झाला साजरा🇮🇳

आष्टी / पठाण शाहनवाज 

आज दिनांक 05 ऑक्टोबर 2021 रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पारगाव जोगेश्वरी मध्ये *सामाजिक वनीकरण विभाग आष्टी* जिल्हा बीड च्या वतीने आजादी का अमृत महोत्सव विविध कार्यक्रमांच्या आधारे पार पडला.
 कार्यक्रमामध्ये शाळेच्या आणि गावाच्या वतीने आलेल्या अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शाळेबद्दल शाळेने केलेल्या कार्याबद्दल माहिती देण्यात आली.वसुंधरेबाबत जागरूकता वाढविण्यासाठी अधिकारी वर्गातून काळे साहेब तसेच अमोल घोडके साहेब यांनी सखोल मार्गदर्शन केले… विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्न घेऊन त्या सर्वांना उत्तरे दिली परिसरातील प्राणी, परिसरातील पक्षी आणि विविध वनस्पती याबाबत सखोल मार्गदर्शन केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेले वृक्षारोपण आणि त्याचे जतन याबाबत विद्यार्थी आणि शाळेच्या अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या शेवटी वसुंधरेच्या संवर्धनासाठी सर्वांच्या वतीने प्रतिज्ञा घेण्यात आली.कार्यक्रम संपल्यानंतर शाळेतील वृक्षारोपण, वनराई बंधारा आणि घन वन वृक्ष लागवड या सर्वांची अधिकाऱ्यांच्या वतीने पाहणी करण्यात आली. त्यासोबतच शाळेमध्ये वृक्षारोपण देखील करण्यात आले. सदरील कार्यक्रमासाठी सामाजिक वनीकरण आष्टीचे मा.येवले साहेब ,मा.घोडके साहेब ,काळे साहेब, बेग साहेब ,शेख साहेब ,खंडागळे साहेब तसेच गावचे प्रथम नागरिक सरपंच मा. तात्यासाहेब कदम उपस्थित होते
जाहिरात 👇👇👇

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments