HomeUncategorizedहाळम फेस्टिव्हलची संस्थापक माधव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारणी जाहिर

हाळम फेस्टिव्हलची संस्थापक माधव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारणी जाहिर

परळी : मागील पंधरा वर्षांपासुन परळी तालुक्यात ग्रामीण भागामध्ये अनेक सांस्कृतिक, शैक्षणिक सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करुन मराठवाड्यात परिचित झालेला हाळम फेस्टिव्हल सार्वजनिक कार्यक्रम अखंडपणे साजरा होत असतो या फेस्टिव्हलची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्ष म्हणून गोविंद माणिकराव दहिफळे यांची निवड करण्यात आली. तर सचिव म्हणून विष्णू प्रकाश दहिफळे यांची निवड करण्यात आली असल्याचे माहिती हाळम फेस्टिव्हलचे संस्थापक माधव मुंडे यांनी दिली आहे.

               ग्रामीण भागात परळी तालुक्यातील हाळम येथे मागील 15 वर्षांपासुन नवरोत्रोत्सवात हाळम फेस्टिव्हलचे आयोजन करुन धार्मिक कर्यक्रमाबरोबरच सामाजीक बांधिलकी जपत कार्यक्रमाच्या आयोजनामुळे या फेस्टिव्हलची मराठवाड्यात ओळख निर्माण झाली आहे.यावर्षी हाळम फेस्टिव्हलच्या माध्यमातुन कार्यक्रमांना भाविकांची मोठी गर्दी होत असते. हाळम फेस्टिव्हलचे संस्थापक माधव मुंडे यांनी फेस्टिव्हलच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षांपासून अनेक सामाजिक कार्यक्रम राबविले जातात. 
        परळी तालुक्यातील हाळम येथील युवा नेते तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस माधव मुंडे हे सबंध जिल्ह्यातील अखंडपणे चालणारा एकमेव नवरात्रत्सवामध्ये चालणारा एकमेव हाळम फेस्टिव्हल आहे. गेली पंधरा वर्षेपासून विविध सामाजिक उपक्रम राबवीत असतात यामध्ये नामवंत किर्तनकारांचे किर्तन महोत्सव, पशू शिबीर, ख्यातनाम कवी, आरोग्य शिबीर, शैक्षणिक, अपंगांना विविध साहित्य वाटप, वृक्षारोपण, शेतकऱ्यांना मार्गदर्शनक शिबीर, मनोरंजनात्मक कार्यक्रम, भारूड, देवीचा जागर, असे विविध उपक्रम राबविले आहेत. यावर्षी कोरोना व अतिवृष्टीच्या सदृश्य काळात नागरिकांचे व शेतकऱ्यांचे आरोग्य जपले पाहिजे या पार्श्वभूमीवर भव्य असा आरोग्य यज्ञ कार्यक्रम घेणार आहेत. 
           हाळम फेस्टिव्हलची कार्यकारी फेस्टिव्हलचे संस्थापक माधव मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून गोविंद माणिकराव दहिफळे, सचिव विष्णू प्रकाश दहिफळे उपाध्यक्ष गणेश शंकर मुंडे, संतोष शिवाजी गुट्टे, हनुमंत व्यंकटी गुट्टे, समाधान वैजनाथ मुंडे, गणेश दिंगाबर दहिफळे, सहसचिव विनायक दगडीराम गुट्टे, संघटक प्रल्हाद अंगद मुंडे, सहकोषाध्यक्ष गणेश शिवाजी गित्ते, प्रदीप अशोक दहिफळे, धनराज लक्ष्मण मुंडे, आकाश ज्ञानेश्वर पेंटुळे, अजय दमोदर गित्ते, कोपाध्यक्ष विष्णू अंगद मुंडे, हरिश्चंद्र जनार्दन मुंडे, अनंत अशोक गुट्टे, प्रशांत अंगद मुंडे दीपक मुंडे, तर जेष्ठ मार्गदर्शक म्हणून देवनाथ दहिफळे, बळीराम मुंडे, मंचक गुट्टे, माणिक दहिफळे, हरिश्चंद्र गुट्टे आदींची कार्यकारीणी निवडण्यात आल्याचे माधव मुंडे यांनी सांगीतले.
जाहिरात 👇👇👇

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments