HomeUncategorizedलखिमपुर घटनेचा काँग्रेस कडून जाहिर निषेध!

लखिमपुर घटनेचा काँग्रेस कडून जाहिर निषेध!

आष्टी/पठाण शाहनवाज

लखिमपुर उत्तरप्रदेश येथील घटनेस जबाबदार असलेल्या केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या मुलास त्वरीत अटक करुन काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियका गांधी यांना बेकायदेशिर रित्या नजर कैदेत ठेवले बाबत जाहिर निषेध
आष्टी तालुका काँग्रेस कमिटी तर्फे निवेदन देउन करण्यात आला. दिल्ली व भारतभर शेतकरी कायदा विरोधी अंदोलन सुरु असून केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने लखिमपुर उत्तर प्रदेश आंदोलकांना स्वतःच्या गाडीखाली चिरडुन हत्या केली आहे. सदर घटना ही गंभीर असुन केंद्र सरकार अंदोलन करण्याचा भारतीय नागरीकांचा मूलभूत अधिकार हिरावू पाहत आहे.
केंद्र सरकार शेतकऱ्यांचे शोषण करत असून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. लखिमपुर उत्तर प्रदेश मधील घटना केंद्र सरकारच्या अन्यायाचा परिसिमा असून त्याचा प्रक्षोप भारतातील प्रत्येक शेतक-यांच्या मनात आहे. तसेच लखिमपुर येथे पिडीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जात असताना मा. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांना बेकायदेशिररित्या सितापूर येथे त्यांना शासकीय विश्रामगृहात नजर कैदेत ठेवले सदरची वागणूक ही बेकायदेशिर असून काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये व सामान्य जनतेमध्ये या बद्दल तीव्र निषेधाच्या भावाना आहेत. तसेच या निवेदनाव्दारे लखिमपुर येथील घटनेचा जाहिर निषेध करत व भविष्यात अशा घटना होऊ नयेत याची जबाबदारी केंद्र सरकारची असून दोषींना अटक करुन त्वरीत कारवाई व्हावी तसेच मा प्रियंका गांधी यांना बेकायदेशिर रित्या लखिमपुर येथे रोखल्याबद्दल उत्तर प्रदेश सरकार व केंद्र सरकारचा जाहिर निषेध मा.जिल्हाधिकारी बीड यांना मा.तहसिलदार आष्टी यांचे मार्फत दिलेल्या निवेदनात व्यक्त केला.यावेळी कॉंग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष विनोद निंबाळकर नानासाहेब आजबे,अँड गोरख आंधळे,अँड दत्तात्रय ससाने, बाबासाहेब लटपटे,शार्दुल जोशी, अहमद पठाण आदी उपस्थित होते
जाहिरात 👇👇👇
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments