आष्टी / पठाण शाहनवाज
तालुक्यातील शिरापूर जिल्हा परिषदेच्या शाळेतील आदर्श शिक्षक बाळु बोठरे यांना स्वामी विवेकानंद पतसंस्थेचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल व कवी प्रेम पवळ यांना काव्यपुष्प साहित्य अकादमीचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल या दोघांचा म्हसोबा वाडी येथे जाहीररीत्या सत्कार करण्यात आला
बाऴु बोठरे सर शिरापूर शाळेत सध्या कार्यरत असून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबवले आहेत .ऑनलाइन शिक्षण गृहभेटी स्वाध्याय सोडवुन घेणे कट्टा शाळा ब्रीज कोर्सची प्रभावीपणे अंमलबजावणी काळातही विद्यार्थ्यांसाठी त्यांनी काम केले त्यांनी आतापर्यत प्राथमिक चिंचेवाडी पिंपळा मेहत्रेवस्ती कुभांरवस्ती याठिकाणी सेवा केली. मेहत्रे वस्तीवर पारधी समाजाच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यामध्ये बाळु बोठरे गुरुजींचा फार मोठा मोलाचा वाटा आहे.सध्या ते बी.एल.ओ. चे काम पाहत असुन बालरक्षकाचीही भुमीका निभावत आहेत. 25 वर्षापासुन विठ्ठलाची महीना वारी करताता.. सामाजिक कार्यातही ते नेहमी अग्रेसर असतात.धार्मिक आध्यात्मिक प्रबोधन करतात. सप्ताहात व इतर ठिकाणी प्रवचन करतात.शैक्षणिक धार्मिक आध्यात्मिक या सर्व क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटत शैक्षणिक धार्मिक व सामाजिक या सर्व क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमठवल्याने स्वामी विवेकानंद पतसंस्थेने या कार्याची दखल घेऊन त्यांना यंदाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केला आहे .
प्रेम पवळ हे उत्कृष्ट कवी असून त्यांना आतापर्यंत,समाज भुषण,समाज रत्न, महाराष्ट्राचा काव्य सम्राट असे एकुण चौदा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत आणि आता त्यांना काव्य पुष्प साहित्य भुषण पुरस्कार तुरताच जाहिर झाला असुन ते उत्कृष्ट वात्रटिकाकार देखील आहेत ते पाच ते सहा हा पेपरला वात्रटिकाकार म्हणून काम करतात आणि कवी प्रेम पवळे यांचे भाव माझ्या मनातला, प्रेमची सत्यवानी,तु सुचवलं म्हणून,वेदनेच्या पाऊलखुणा हे काव्य संग्रह प्रकाशित आहे आणि थोड्याच दिवसात राजकारण घालं चुलीत हा काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहे. त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मा.सरंपच आजिनाथ शेकडे,मिठ्ठु शेकडे सर,के,बी,शेकडे,मुंडे सर, रामेश्वर सुंबे महादेव आमले सह आदी गावकरी उपस्थित होते.
जाहिरात 👇👇👇