बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड )
शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा चिटणीस तथा रायगड जिल्हा परिषद पक्ष प्रतोद अॅड. आस्वाद उर्फ पप्पू शेठ पाटील यांचे शुक्रवार दिनांक ०८ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील तळा तालुका पक्ष कार्यालय मनोहर निवास बामणघर रोड येथे सकाळी ठीक १० : ३० वाजता आगमन होणार आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे विद्यमान रायगड जिल्हा चिटणीस अॅडव्होकेट आस्वाद तथा पप्पू शेठ पाटील यांच्या तळा तालुका येथील आगमनाच्या पार्श्वभूमीवर तळा तालुक्यातील सर्व शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षाचे क्रियाशील डॅशिंग तळा तालुका चिटणीस धनराज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जय्यत तयारीला लागले असून त्यांनी तालुक्यातील आपल्या शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व पदाधिकारी, महिला मंडळ कार्यकर्त्यांना आणि ग्रामस्थांना या संदर्भातील पुर्व कल्पना देऊन वेळेत उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.
तळा तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून तालुक्याच्या नाक्या नाक्यावर शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस अॅडव्होकेट आस्वाद पाटील यांच्या आगमनाच्या स्वागताचे मोठ मोठे बॅनर / होर्डिंग्ज लाऊन स्वागतासाठी तळा तालुका सज्ज झाला आहे.
जाहिरात 👇👇👇