आष्टी / पठाण शाहनवाज
टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सय्यद पिंपरी तालुका क्रिडा संकुल येथे 23 ते 26 सप्टेंबर मध्ये 5 व्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा राज्य सचिव सौ. मिनाक्षी गिरी मॅडम यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाल्या. या स्पर्धेत राज्यातून मुलांच्या 22 व मुलींच्या 8 संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत बीड जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन च्या ग्रामीण व शहरी दोन संघ सहभागी झाले होते. सुरेश मोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यातील खेळाडूंनी उत्कृष्ट फलंदाजी व गोलंदाजी करत राज्य संघ निवड कर्त्यांचे लक्षवेधी कामगिरी केली. तसेच तीन खेळाडूंनी मॅन ऑफ द मॅच अवार्ड मिळवले. राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेतील बीड जिल्ह्याच्या खेळाडूंच्या कामगिरी चा विचार करत राज्य संघटना सचिव सौ मिनाक्षी गिरी यांच्या सूचनेनुसार राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी विशाल बोकेफोड, शिंदे सचिन,वाघुले सागर,सय्यद आवेज,तरटे हनुमंत,कृष्णा कर्डिले, रविनारायण साहु,कृष्णा मुंडे, आमटे उत्कर्ष, तळेकर आदित्य यांची राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. निवड झालेले खेळाडू मथुरा उत्तर प्रदेश येथे होणा-या 6 व्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत प्रतिनिधित्व करणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे अध्यक्ष कांतीलालजी चानोदिया, शकिलभाई शेख, बबलु सय्यद,अनिल ढोबळे,संपत एकशिंगे, शेकडे सूर्यकांत, सामाजिक, राजकीय, पत्रकारीता, क्रिडा क्षेत्रातील पदाधिकारी नागरिकांच्या च्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.
जाहिरात 👇👇👇