आष्टी : पठाण शाहनवाज
कोरोना सारख्या जागतिक महामारीने व निसर्गाच्या लहरी पणामुळे शेतकरी मेटाकुटीvला आला आहे. आष्टी तालुक्यात कांदा हे मुख्य पिक आहे. आता कांद्याला रासायनिक खते देण्याच्या वेळी खतांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.
ज्या ठिकाणी खते मिळतात तेथे चढ्या भावाने म्हणजे कंपनीच्या सुधारित भावापेक्षा २०० ते २५० रूपये जास्त किंमत मोजावी लागत आहे.बिलाची मागणी केली तर खत शिल्लक नाही,असे उत्तर येते ज्यांना वीस पंचवीस बॕग ठेवण्याचा परवाना आहे, त्यांच्याकडे चारशे ते पाचशे बॕगेचा साठा आहे. हि परिस्थिती आष्टी तालुक्यात सर्रास दिसून येते यावर कोणतेही अधिकारी वर्गाचे वचक दिसून येत नाही.
रोज संध्याकाळी साडेसात वाजता टिव्हीवर आर सी एफ सुफला मुबलक प्रमाणात आहे. अशी जाहिरात येते ती फक्त शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठीच..! असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहे.
ह्या सर्व परिस्थिवर कृषी विभागाने लवकरात लवकर किंवा प्रशासकिय यंञणेने शेतकर्यावरील होणारा अन्याय व शेतकर्यांचे होत असलेले शोषण कुठल्याही परिस्थित थांबले पाहिजे.दोषी कृषी सेवा केंद्रावर तत्काळ दंडात्मक कार्यवाही केली पाहिजे. तसेच कृषी सहाय्यक यांनी उंटावरून शेळ्या हाकण्यापेक्षा मुख्यालयी राहुन काम पहावे .प्रत्येक कृषी सेवा केंद्रात दर्शनीभागात साठा व दरफलक असणे बंधनकारक आहे परंतू असे फलक कुठेही नाहीत याविषयी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री शेख आजमोद्दीन व सामाजिक कार्यकर्ते श्री परमेश्वर घोडके यांनी तालूका कृषी अधिकारी यांचेकडे फोनवर संवाद साधत तक्रार केली आहे.त्यांना अशाप्रकारे कुणी शेतकऱ्यांची लूट करत असल्याचे परत तक्रार आल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. आष्टी तालुक्यात कुठे कुठे कृषी सेवा केंद्रांवर चढ्या भावाने खत विक्री केली जात आहे त्याची पाहणी करण्याचे आदेश मंडळ अधिकारी व कृषी सहाय्यक यांना दिले असून मी स्वतः उद्या पासून पाहणी करून दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही केली जाईल. तालुका कृषी अधिकारी तरटे
जाहिरात 👇👇👇