आष्टी / पठाण शाहनवाज
महाराष्ट्र राज्य एन.जी.ओ.फेडरेशन या सामाजिक संस्थेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी अविनाश कदम यांच्या निवडीचे नियुक्ती पत्र . एन.जी.ओ.फेडरेशन संस्थापक अध्यक्ष दिपक आगळे पाटील व प्रदेश कार्याध्यक्ष राजकुमार मुंडे यांनी दिले आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना अविनाश कदम म्हणाले की महाराष्ट्र राज्यातील व बीड जिल्ह्यातील सर्व सामाजिक संस्थांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी व संस्थाना बळ देऊन त्या सामाजिक संस्था सक्षम करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे व केंद्र शासनाच्या विविध योजना व राज्य शासनाच्या विविध योजनांची योग्य माहिती सामाजिक संस्थांना दिली जाणार आहे . व महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशन चे संस्थापक अध्यक्ष दिपक आगळे पाटील यांच्या पुढाकारातून महाराष्ट्र राज्यातील सर्व सामाजिक संस्था सक्षम बनत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील हे एकमेव फेडरेशन आहे की छोट्या मोठ्या संस्थाना शासकीय अनुदान व योजनेची माहिती महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून संस्थाना दिली जाते त्यामुळे ही पुर्ण जिल्ह्यातील संस्थांना एक छताखाली आणुन योग्य नियोजन करून न्याय मिळवून देऊ असे म्हणाले त्यांच्या निवडीबद्दल प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रय खोगरे, प्रदेश सचिव अविनाश तोंडे,
डॉ सुवर्णाताई पाटील,विद्याताई बेनगुडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
जाहिरात 👇👇👇