आष्टी /पठाण शाहनवाज
आष्टी तालुक्यातील पुंडी येथील एका शेतकऱ्याचा विज पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल शनिवारी दुपारच्या सुमारास घडली.शेतात जनावरे चारत असताना दुपारच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस व विजेचा कडकडाट सुरू असताना विज अंगावर कोसळून शत्रुघ्न लक्ष्मण काकडे (वय ३६) यांचा जागीच मृत्यू झाला.
अधिक माहिती अशी की,आष्टी तालुक्यातील पुंडी येथील शेतकरी शत्रुघ्न काकडे हे शेतात जनावरे चारण्यासाठी घेऊन गेले होते. दुपारी तीन साडेतीनच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस व विजा कडकडत असताना हीच कडकडत असलेली वीज त्यांच्या अंगावर कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यावर शनिवारी रात्री उशिरा अंत्यविधी करण्यात आला. त्यांच्या पश्यात आई, वडिल, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
जाहिरात 👇👇👇